जुन्नर : राज्यातील अनेक ठिकाणी लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे, मात्र ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हा लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे, तसेच जुन्नर शहरात देखील निर्बंध कायम राहणार आहेत.
पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार जुन्नर नगरपरिषद प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केल्याने जुन्नर शहरातील निर्बंध १५ जून पर्यंत कायम राहणार आहे. यामध्ये भाजीपाला, किराणा, दूध तसेच कृषी विषयक साहित्य बी बियाणे, औषधे, खते विक्रीची दुकाने आदी अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७ ते सकाळी ११ वाजे पर्यंत सुरू राहणार आहे. तसेच इतर अत्यावश्यक सेवेमध्ये नसणारी सर्व दुकाने बंद राहणार आहे.