Thursday, December 26, 2024
Homeग्रामीणमावळ : जनवादी महिला संघटना व DYFI तर्फे जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण

मावळ : जनवादी महिला संघटना व DYFI तर्फे जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण

मावळ (पुणे) : मावळ तालुक्यातील सुदवडी येथील अखिल भारतीय जनवादी महिला संघटना व डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी श्रीक्ष्रेत्र भंडारा डोंगर येथे वृक्षारोपण करण्यात आले.

दरवर्षी या संघटना वृक्षारोपण करत असतात. वृक्षारोपण करण्यासाठी लागणारी रोपे हे कार्यकर्ते स्वतः बनवतात. समाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संघटना, ग्रामीण व शहरी भागातील मेळ घालताना पहायला मिळतात. 

याबाबत बोलताना डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे पिंपरी चिंचवड शहर सचिव म्हणाले, राई जांभळाच्या बिया आणून त्याच्या 100 रोपांची नर्सरी आम्ही घरी गेल्यावर्षी कोरोना लॉकडाऊन काळात केली होती. आम्ही दरवर्षी अशाप्रकारे रोपवाटिका तयार करतो, व वृक्ष लागवड करतो.

यावेळी जांबवडे ग्राम पंचायत सदस्या स्वाती शिंदे, बाळासाहेब शिंदे, अशोक उजागरे, सुप्रिया जगदाळे, सुप्रिया शिंगटे, अनिता कऱ्हे, सुरेखा काळे, अपर्णा दराडे आणि पावसु कऱ्हे, दौलत शिंगटे हे उपस्थित होते.


संबंधित लेख

लोकप्रिय