जुन्नर : कोरोना महामारी चे विपरीत परिणाम मानव आणि प्राणी यांच्यावर झाले आहेत. जुन्नर हा निसर्गसंपन्न, पर्यटन तालुका आहे. पर्यटकांची नेहमी रेलचेल असते. परंतु लॉकडाऊनमुळे हे पुरते थांबले आहे. याचा परिणाम श्री क्षेत्र लेण्याद्री येथील माकडांवर झाला आहे. त्यांना खायला मिळत नाही. त्यांनी आपला मोर्चा नागरी वस्तीकडे वळवला आहे.
हे पाहून तालुक्यातील युवकांनी “एक घास त्याच्यासाठी” हा उपक्रम हाती घेतला आहे. हे युवक स्वतः शेतकरी, आणि दानशूर व्यक्तींकडे जाऊन ही मदत जमा करतात. माकडांना खाऊ घालतात.
यामध्ये प्रामुख्याने पंकज सरजिने,जीतू सरजिने,अक्षयभाऊ सरजिने,विनायकभाऊ सरजिने, चेतन सरजिने, संदेश गाढवे, यश सरजिने,ओम सरजिने, दादू डुंबरे यांच्यासह अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.