Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआमदार महेश लांडगे याचे मदतीचे 26 ट्रक कोकण सह पश्चिम महाराष्ट्रात दाखल

आमदार महेश लांडगे याचे मदतीचे 26 ट्रक कोकण सह पश्चिम महाराष्ट्रात दाखल

पिंपरी चिंचवड : कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तब्बल 26 ट्रक घेऊन  भोसरी विधान सभेचे आमदार महेश लांडगे रवाना झाले आहेत. आपत्तीग्रस्त गावात स्वतः उपस्थितीत राहून ते मदत करीत आहेत.

कोकणातील महाड व चिपळूण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापुर इथे गेल्या आठवडाभरापासून महापुराने मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये अनेक नागरिक बाधित झाले. अनेकांनी आपला जीव गमावला. याची झळ अनेक कुटुंबांना बसली. शेतकरी बांधवांनी आपली जनावरे गमावली. शेती देखील सध्या पाण्याखाली गेली आहे. अशा चहुबाजूंनी वेढलेल्या संकटाचा सामना हे आपले बांधव करीत आहेत.

अशा पूरग्रस्तांना सावरण्यासाठी आमदार लांडगे यांनी ‘एक हात मदतीचा’, असे आवाहन करीत लोकसहभागातून खारीचा वाटा उचलला आहे. त्यासाठी भाजपा नगरसेवक, दानशूर नागरिक, संस्था यांना मदतीसाठी आवाहन केले आणि स्वतः देखील या उपक्रमात पुढाकार घेतला.

आमदार लांडगे यांनी केलेल्या आवाहनानुसार तब्बल 26 ट्रक साहित्य जमा झाले आहे. प्रत्येक ट्रकमध्ये सुमारे 6 टन साहित्य आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तू, किराणा, लहान मुलांचे कपडे आदींचा समावेश आहे. हे साहित्य घेऊन गाड्या आज पुरग्रस्तांच्या माहितीसाठी रवाना झाल्या.

भोसरीतील महेश लांडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून हे साहित्य पूरग्रस्त बांधवांसाठी रवाना करण्यात आले. यावेळी पक्षाचे नगरसेवक व कार्यकर्ते संस्था संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की,आम्ही कोकणात फिरायला जातो तेव्हा कोकणवासीय आमचे आदरातिथ्य करतात,त्यांच्या संकटकाळात आम्ही साथ देत आहोत. “पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुन्हा एक हात मदतीचा” हा उपक्रम आम्ही हाती घेतला होता. पिंपरी-चिंचवडकरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महापुरामध्ये बाधित झालेल्या कोकणातील महाड व चिपळूण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात 26 ट्रक मदत रवाना केली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या नागरिकांना मानवता धर्माचे पालन करीत मदत करता आली. या उपक्रमाला लोकांनी भरभरून साथ दिली, याचे समाधान वाटते.


संबंधित लेख

लोकप्रिय