Wednesday, August 17, 2022
Homeजिल्हामांजरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये रोबोटिक्स स्पर्धेचे आयोजन

मांजरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये रोबोटिक्स स्पर्धेचे आयोजन

spot_imgspot_imgspot_imgspot_img

मांजरी बु. : सध्याच्या काळात कॉम्प्युटर, लॅपटॉप यांचे युग अवतरले आहे. बदलणाऱ्या काळासोबत नवीन आयुधे, नवीन सामग्री, नवीन तंत्रज्ञान यांचा आधार आपल्याला घ्यावा लागतो. तुम्हाला त्या काळाच्या बरोबर जावं लागतं आणि काळाच्या बरोबर जाताना तुम्हाला ते तंत्रज्ञान आत्मसात करावे लागते. तंत्रज्ञान युगामध्ये जागतिक दर्जाचे अभियंते तयार झाले पाहिजे असे मत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव (प्रशासन) आत्माराम जाधव यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने मांजरी बुद्रुक येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयात तंत्र २०२१ रोबोटिक्स मॉडेल मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना आत्माराम जाधव बोलत होते. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.ललित पाटील यांनी व्यक्त केले.  

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रितेश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये रोबोटिक्स स्पर्धेच्या आयोजनामागची भुमिका स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील रोबोटिक्स, बिग डेटा व डेटा सायन्स या संकल्पनांच्या माध्यमातून संधींचा फायदा घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले. महाविद्यालयातील पीडीईए टीम ज्यागवॉरच्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधील कामगिरीचा आढावा प्रा.अजित डुंबरे यांनी घेतला. 

महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.केतन डुंबरे यांनी सर्वांना कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांच्या कार्याचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अश्विनी बामणीकर यांनी केले  व प्रा.शालु सारस्वत यांनी आभार मानले. 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.नितीन कुंभार, प्रा.सोमनाथ शिरसाठ, प्रा.अशोक गायकवाड, परिक्षित थोरात यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय