जुन्नर / रवींद्र कोल्हे : नारायणगाव (दि.२८ जुलै ) येथील गावकुस शिवारातील एका घरात वारांगना”चा (वेश्या व्यवसाय) करून घेत असल्याच्या कारणावरून वारांगना व्यवसायाची मालकीण ‘संगीता संजय भोईटे’ (वय ४७ रा.नारायणगाव ता.जुन्नर जि. पुणे) या महिलेवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५९ चे कलम ३,४,५,७(१)(ब)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे वारांगना व्यवसायासाठी आणलेल्या महिलांना मुंढवा येथील पुणे येथील सुधार गृहात रवाना करण्यात आल्याची माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
या बाबत अधिक माहिती अशी की, नारायणगाव पोलिस ठाण्याच्या कार्यक्षतेत्रातील नारायणगाव येथील एका इमारतीत राहणाऱ्या आरोपी नामे वारांगना मालकीण संगीता संजय भोईटे (वय ४७ रा.नारायणगाव) ही वारांगना (वेश्याव्यवसाय) साठी इतर महिलांना बोलावून घेऊन त्यांचे कडून ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन वारांगना व्यवसाय करत असल्याची गोपनीय माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांना मिळाली.
जुन्नर उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलिस पथकाने अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार मिळालेल्या ठिकाणी अचानक छापा टाकला. या छाप्यात तीन महिला मिळून आल्या त्यांचेकडे पोलिसांनी चौकशी केली असता, ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन वारांगना व्यवसाय करीत असून, मिळालेल्या पैशातून ठराविक रक्कम मालकीनीला देत आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी मालकीण संगीता संजय भोईटे हिच्यावर गुन्हा रजिस्टर नं.१४२/२०२१ अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५९ चे कलम ३,४,५,७ (१)(ब) अन्वये दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण विवेक पाटील, जुन्नर उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पो.ना.दिनेश साबळे, म.पो.ना.मेचकर, पो.ना.धनंजय पालवे, पो.कॉ.सचिन कोबल, पो.कॉ. शैलेश वाघमारे, होमगार्ड आकाश खंडे यांचे पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे करीत आहे.