Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणवनबंधू कल्याण योजनेचे नाव बदलण्याची बिरसा फायटर्सची मागणी

वनबंधू कल्याण योजनेचे नाव बदलण्याची बिरसा फायटर्सची मागणी

spot_imgspot_imgspot_imgspot_img

रत्नागिरी : वनबंधू कल्याण योजनेचे नाव बदलून आदिवासी कल्याण योजना किंवा मूळनिवासी कल्याण योजना नाव ठेवण्यात यावे, अशी मागणी सुशीलकुमार पावरा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री अॅड.के.सी.पाडवी व आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक यांनी कंत्राटी  ए. एन.एम.(ANM) पदभरती साठी जाहीरात काढली आहे. या जाहीरातीत “वनबंधू कल्याण योजना”असे योजनेच्या नावाचा उल्लेख केला आहे. तसेच जाहीरातीत आदिवासी विकास विभागामार्फत वनबंधू कल्याण योजना अंतर्गत सुरगाणा तालुक्यातील आश्रम शाळाकरिता ए.एन.एम.पदभरतीसाठी करार पद्धतीने पात्र उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत (Walk in Interview) खालीलप्रमाणे राबविण्यात येत आहे. असा उल्लेख केला आहे. यावरून सदर जाहिरात ही आदिवासी विकास विभाग व जिल्हा परिषद नाशिक या दोन विभागाशी संबंधीत आहे दिसून येतो. परंतु सुरगाणा हा आदिवासी बहूल तालुका असल्यामुळे वनबंधू हा शब्द आदिवासींना उद्देशून वापरलेला शब्द आहे, असे जाणवते. त्यामुळे आदिवासींच्या भावना दुखावल्या आहेत. समाजात तीव्र संताप निर्माण झाला आहे. 

तरी आदिवासींना वनबंधू किंवा वनवासी म्हणून उल्लेख करू नये. वनबंधू किंवा वनवासी या शब्दाला आदिवासी समाजातून विरोध होय आहे. आदिवासींचे कल्याण करायचे असेल तर आदिवासींना ठेस पोहोचणार नाही अशा योग्य शब्दांचा कुठल्याही योजनेसाठी वापर करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय