Friday, November 22, 2024
HomeNewsअवकाळी पाऊस बळीराजाचं नाही तर तुमचंही बजेट बिघडवणार, कसं ते पाहा

अवकाळी पाऊस बळीराजाचं नाही तर तुमचंही बजेट बिघडवणार, कसं ते पाहा

आधीच महागाई वाढली आहे. पगार मात्र लोकांचं वाढत नाहीत. बजेटनंतर जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. घरच्या गॅस सिलिंडरपासून जेवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू असो की भाजीपाला सगळा महाग होत आहे.

तर दुसरीकडे घराचे हप्ते, कर्ज EMI देखील वाढल्याने सर्वसामान्य लोकांचं बजेट बिघडलं आहे. एकीकडे अवकाळी पावसानं शेतकऱ्याचं पिक वाहून गेलं आहे. अचानक झालेल्या पावसाचा राज्यातील पिकांना मोठा फटका बसला. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे.

हातातोंडाशी आलेला घास गेल्यानं बळीराजा जगायचं कसं या चिंतेत आहे. तर दुसरीकडे फळं, कडधान्य येत्या काळात महाग होण्याची शक्यता आहे. वाशिमच्या उंबर्डा बाजार परिसरात हरभरा काढणीला सुरुवात झाली आहे. येत्या आठवडाभरात काढणी पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

तर वातावरण बदलामुळे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाशिमच्या ५ हजार हेक्टरवरील रब्बी पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. कारंजा,रिसोड,वाशिम,मंगरुळपिर,मालेगांव आणि मानोरामध्ये सर्वाधिक नुकसान झालं आहे. 200 ते 300 हेक्टरवरील संत्रा बागांचं नुकसान झालं आहे.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा,रिसोड,वाशिम,मंगरुळपिर,मालेगांव आणि मानोरा या 6 तालुक्यातील 5 हजार हेक्टर हुन अधिक क्षेत्रातील रब्बी गहू,हरभरा,ज्वारी,कांदा बीज आणि भाजीपाला या पिकांचं 5 नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच किमान 200 ते 300 हेक्टर वरील संत्रा बागांचं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाने नंदुरबारला झोडपलं. 1500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज.

ज्वारी, हरभरा, टरबूज, खरबूज, कांदा, पपई आणि केळी पिकांचं नुकसान झालं आहे. फळं आणि कडधान्य येत्या काळात महाग होण्याची शक्यता यामुळे व्यक्त केली जात आहे. यासाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

संबंधित लेख

लोकप्रिय