चांदवड (सुनील सोनवणे) : आज चांदवड तालुक्यातील मंगरूळ, आसरखेडे, भोयेगाव व शेलू येथे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आज (ता.८) आमदार डॉ.आहेर यांच्या हस्ते करण्यात आले.
१) मंगरूळ :
मंगरूळ येथे स्थानिक विकास निधी अंतर्गत बौद्ध विहारच्या सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले.
२) आसरखेडे :
स्थानिक विकास निधी अंतर्गत खंडेराव मंदिर समोरील सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले.
३) भोयेगाव :
तिसगाव, बहादुरी, वडाळीभोई, भोयेगाव रस्ता रामा २५ की.मी. ३३/५०० मध्ये पूल बांधने या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
४) शेलू :
स्थानिक विकास निधी अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी कृ.उ.बा.समिती सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे, जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.नितीन गांगुर्डे, भाजपा तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, पंचायत समिती सभापती पुष्पाताई धाकराव, यु.मो. तालुका अध्यक्ष शांताराम भवर, बाळासाहेब वाघ, सुनील शेलार, मोहन शर्मा, अशोक भोसले, विजय धाकराव, सुभाष पुरकर, गोरख ढगे, वाल्मीक वानखेडे, पोलीस पाटील बाजीराव वानखेडे, बाळासाहेब ठाकरे, गणपत ठाकरे, राहुल जाधव, उत्तमराव ठोंबरे, सरपंच प्रकाश जाधव, लक्ष्मण गलांडे, शिवनाथ बोरसे, योगेश ढोमसे, साहेबराव ठोंबरे, शरद ढोमसे, फौजी नाना घुले, सरपंच रेखाताई ढोमसे, अनिल मते, बाळू कावळे, विजय जाधव तसेच ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक गावातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.