Wednesday, May 1, 2024
HomeNews'लामां'चा पुनर्जन्म; Himachal Pradesh मधील अवघ्या 4 वर्षांचा चिमुकला कसा झाला बौद्ध...

‘लामां’चा पुनर्जन्म; Himachal Pradesh मधील अवघ्या 4 वर्षांचा चिमुकला कसा झाला बौद्ध धर्मगुरू?

बौद्ध धर्माच्या उपासकांना त्यांचे नवे धर्मगुरू सापडले आहेत. (Himachal Pradesh) हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पितीमध्ये (Lahaul spiti) असणाऱ्या साडेचार वर्षांच्या नवांग ताशी राप्टेन (Nawang Tashi Rapten) या मुलाला अधिकृत भिख्खू झाल्यानंतर बौद्ध गुरु रिनपोछे(Reincarnation of Rinpoche) चे अवतार म्हणून उपाधी देण्यात आली. याच आठवड्याच्या सुरुवातीपासून त्यांना धार्मिक आयुष्यात सहभागी करुन घेण्यात आलं. परंपरेनुसार तिबेटीयन बौद्ध साधू किंवा धर्मगुरुंना लामा असं म्हटलं जातं. त्यामुळं राप्टेन यांनाही ही उपाधीसुद्धा देण्यात आली. लामांमध्येही विविध स्तर आहेत. जसं, दलाई लामा (Dalai Lama), पंचेन लामा, कर्मापा लामा इत्यादी.

राप्टेन यांचा जन्म 16 एप्रिल 2018 ला झाला होता. देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या लाहौल स्पिती जिल्ह्यात असणाऱ्या (Spiti Valley) स्पितीच्या खोऱ्यातील ताबो (Tabo) भागात असणाऱ्या रंगरिक (Rangrik) गावचे ते मूळ निवासी.

हा खरंच पुनर्जन्म?


2022 या वर्षाच्या सुरुवातीलाच राप्टेनला (Tibetan buddhist monk) तिबेटी बौद्ध धर्माच्या निंगमा शाळेतील प्रमुख तकलुंग सेतुल रिनपोचे यांच्या पुनर्जन्माच्या रुपात असल्याचं ओळखलं होतं. भूतान येथील ल्होद्रक खार्चु मठाचे सर्वात मोठे आणि आदरणीय भिख्खू नामखाई निंगपो रिनपोचे यांनी राप्टेनच्या न्यिंग्मा संप्रदायातील प्रमुखाला नियुक्त केलं होतं. यानंतर शिमला येथील दोरजीदक मॉनेस्ट्री(मठ) मध्ये या मुलाला साधूपद प्राप्त झालं. यावेळी आपल्यासाठी हा एक मोठा क्षण असून, गेल्या सात वर्षांपासून या क्षणाची आम्ही प्रतीक्षा करत असल्याचं म्हणत चार वर्षीय नवांग ताशी राप्टेन यांचं बौद्ध भिख्खूंनी नव्या पदावर स्वागत केलं.

अतिशय महत्त्वाच्या पदावर आल्यानंतर आता राप्टेन मोठ्या भिख्खूंची भेट घेऊन काही महत्त्वाच्या गोष्टींचा बोध आणि शिकवण घेतली. त्यानंतर त्यांचं शिक्षण सुरुच राहील. दरम्यान, एका भव्य समारंभामध्ये नर्सरीमध्ये शिकणाऱ्या नवांग ताशी राप्टेन यांना अधिकृतपणे बौद्ध भिख्खूंच्या समुहात समाविष्ट करून घेण्यात आलं. आता इथून पुढे ते शिमला येथील पंथाघाटीमध्ये दोरजीदक मठातून आपल्या पुढील शिक्षणास सुरुवात करतील.

कोरोनाच्या संकटामुळं गेल्या दोन वर्षांमध्ये बौद्ध धर्मियांनी धर्म गुरुंचा चौथा पुनर्जन्म साजरा केला नव्हता. 2015 मध्येच त्यांच्या तिसऱ्या धर्मगुरुंचं देहावसान झालं होतं. 2018 मध्ये “तक्लुंग चेतुल रिंपोछे” च्या रुपात त्यांच्या चौथ्या धर्म गुरुंचा जन्म झाला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय