Monday, May 13, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडबंद असणारे वाहतूक नियंत्रित दिवे चालू करा – अर्बन सेल अध्यक्ष मनीषा...

बंद असणारे वाहतूक नियंत्रित दिवे चालू करा – अर्बन सेल अध्यक्ष मनीषा गटकळ यांनी वाहतूक नियंत्रण आयुक्तांकडे मागणी

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : बंद असणारे वाहतूक नियंत्रित दिवे चालू करा, अशी मागणी अर्बन सेल अध्यक्ष मनीषा गटकळ यांनी वाहतूक नियंत्रण आयुक्तांकडे केली आहे.

शहरात बंद असलेले आणि ब्लिंकर झालेल वाहतूक दिवे त्वरित चालू करावेत तसेच पादचाऱ्यांना त्यांचा हक्काचा वेळ वाढवून दयावा, 10 सेकंद ऐवजी ज्या सिग्नल च्या जवळ शाळा आहेत, त्या ठिकाणी महिला आणि मुलांचा विचार करुन तो 25 सेकंदाचा करावा, तसेच जेष्ठ नागरिकांचा विचार करुुन काही ठिकाण चा वेळ 15 ते 20 सेकंड करावा. अति उत्साही लोक सिग्नल तोडूंन फ़ास्ट जातात त्यामुळे अपघात होतात त्यावर ट्रैफिक पोलिसांच नियंत्रण असावं, पदपथाचे दिवे चालू असावेत, अशा अनेक मागण्या करत, राष्ट्र्वादी अर्बन सेलच्या शहराध्यक्षा मनिषा गटकळ या जबाबदारीने वाहतूक नियंत्रण विभागाचे उपायुक्त आनंदजी भोईट सर यांच्याकड़े निवेदन पत्राद्वारे मागणी केली. निवेदन देताच उपायुक्त आनंद भोईट यांनी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन देऊन त्यांनी तत्काळ आमच्या समोरच त्याचे सर्व यंत्रणाव्दारे काम करण्याचे आदेश दिले.

सदर निवेदन देताना अर्बन सेल निरीक्षक आणि झोपड़पट्टी सेल अध्यक्ष सुनीता अडसुळ, अर्बन सेल निरीक्षक मिराताई कुदळे, अर्बन सेल जेष्ठ नागरिक कमिटी समन्वयक संगिता गोडसे, अर्बन सेल शहर सुधार कमिटी समन्वयक बबिता बंनसोडे, अर्बन सेल युवती कमिटी समन्वयक मीराताईं कांबळे, झोपडपट्टी सेल च्या पिपरी विधानसभा अध्यक्षा शिला गायकवाड़ इत्यादी महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय