नोएडा : नोएडातील (Noida) सेक्टर 93 मधील 103 मीटर उंचीची ट्विन टॉवर (Twin Tower) अखेर पाडण्यात आली आहे. हे टॉवर बेकायदेशीर असल्याने आज दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी हा टॉवर पाडण्यात आली.
नोएडामधील ट्विन टॉवर या इमारतीमध्ये तब्बल 3700 किलो विस्फोटके (Explosive) लावण्यात आली होती. ही टॉवर पाडताना प्रत्येक मजल्यावर आणि तळात स्फोटकांचा साठा ठेवण्यात आला होता. 2 वाजून 30 मिनीटांनी एक बटन दाबताच 9 सेंकदात ही इमारत झरझर पत्त्याच्या इमारतीप्रमाणे कोसळली.
एमराल्ड कोर्टाचा एक भाग असलेल्या एपेक्स (32 मजली) आणि सेयाने (29 मजली) हे टॉवर्स बांधकामासंबंधीच्या अनेक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले, त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात दीर्घ कायदेशीर लढा लढला गेला, त्यानंतर आज अखेर हा टॉवर पाडण्यात आला. यासाठी वॉटर फॉल इम्प्लोशन तंत्राचा वापर करण्यात आला.
जगात यापूर्वीही अनेक ठिकाणी गगनचुंबी इमारत उद्धवस्त करण्यात आल्या आहेत. त्या इमारतीत प्रशासनाच्या देखरेखीखाली उद्धवस्त करण्यात आल्या.