Friday, April 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडएस.एम.जोशी कॉलेजमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी संपन्न

एस.एम.जोशी कॉलेजमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी संपन्न

हडपसर / डॉ. अतुल चौरे : एस. एम. जोशी नामांकित कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सांस्कृतिक विभागाच्या वतीने क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी मंडळ विभागामार्फत विद्यार्थ्यांना तिरंगा झेंड्याचे वाटप करण्यात आले.


इतिहास विभागामार्फत ‘इन्कलाब’ हा माहितीपट दाखविण्यात आला. ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मराठी विभागाच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ‘विभाजन विभिषीका स्मृतिदिनानिमित्त’ इतिहास विभागप्रमुख डॉ. दिनकर मुरकुटे यांनी मार्गदर्शन केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा आनंद घेताना क्रांतिकारकांच्या बलिदानाचे आपण सर्वांनी स्मरण करावे, असे डॉ.मुरकुटे म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे म्हणाले की, आपली भारतीय संस्कृती समृद्ध आहे. आपण विविधतेतून एकता टिकवून भारत देश बलशाली करूया. असे विचार व्यक्त केले.


१५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात ज्यांनी योगदान दिले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. एन.सी.सी.च्या कॅडेट्सने उत्तम संचलन करीत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्याचे नेतृत्व लेफ्ट. प्रा. रमेश गावडे यांनी केले. यावेळी विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.



तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ऑनलाइन प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले होते. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेले विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांच्या मार्गदर्शनाने उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य प्रा. संजय जडे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शिल्पा शितोळे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉ.रंजना जाधव, डॉ.दिनकर मुरकुटे, डॉ.ऋषिकेश खोडदे विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख डॉ.अतुल चौरे, मराठी विभागप्रमुख डॉ. राजेंद्र ठाकरे, यांच्या बरोबरीने महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांनी मोलाचे सहकार्य केले.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय