Tuesday, April 30, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडनागरिक, लोकप्रतिनिधी आणि कामगार यांच्या सहकाऱ्यामुळे शहराची प्रगतीकडे वाटचाल सुरू -...

नागरिक, लोकप्रतिनिधी आणि कामगार यांच्या सहकाऱ्यामुळे शहराची प्रगतीकडे वाटचाल सुरू – राजेश पाटील

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनासमोरील प्रांगणात अमृतमहोत्सवी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती अग्निशमन सेवा पुरस्कार मिळालेले महागरपालिकेचे अग्निशमन अधिकारी किरण बालमुकुंद गावडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग यांचे समोर आयुक्त राजेश पाटील यांनी देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याची गौरव गाथा सांगितली.

ते म्हणाले की, उद्योग, माहिती तंत्रज्ञान, दळणवळण, आधुनिक शिक्षण ई सर्व क्षेत्रात 75 वर्षातील देशाची वाटचाल खूप उल्लेखनीय आहे. उपेक्षित वर्गाच्या सक्षमीकरण करण्यात आपण यशस्वी होत आहोत. देशाच्या सर्वोच्चपदी पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती झाल्या आहेत. ही आपल्याला अभिमानास्पद घटना आहे.

पिंपरी चिंचवड हे स्मार्ट शहर देशात सुप्रसिद्ध होत आहे, याचा विशेष उल्लेख करताना ते म्हणाले की, या शहराच्या विकासात माननीय पालक मंत्री, खासदार, आमदार, सर्व लोकप्रतिनिधी यांनी योगदान दिले आहे. नागरिकांच्या सहभागातून वेगवेगळे उपक्रम राबवून आपण माईल स्टोन निर्माण केलेले आहेत.

आपली आरोग्यसेवा देशात नामांकित आहे, आपल्या एकूण 5 हॉस्पिटल मध्ये 24 तास वेगवेगळ्या सर्वोपचार सेवा उपलब्ध आहेत. अजून दोन हॉस्पिटल आपण बांधणार आहोत. शहरातील नागरिकांच्या आरोग्य सुविधा गतिमान करण्यासाठी विविध ठिकाणी जिजाऊ क्लिनिक कम्युनिटी क्लिनिक स्थापन केली जाणार आहेत. नवीन पॅरामेडिकल आणि एमबीबीएस कॉलेज सुरू करणार आहोत. नागरिकांनी कचरामुक्त शहर अभियानासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करून शहसर्वासियाना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या कार्यक्रमास तृतीयपंथीय सुरक्षारक्षक, ग्रीनमार्शल पथक, महाराष्ट्र सुरक्षा मंडळ जवान, अग्निशमन दल यांनी मानवंदना दिली.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय