Sunday, May 5, 2024
Homeजिल्हादुकानातून पैसे गायब करणारे चोर अटकेत

दुकानातून पैसे गायब करणारे चोर अटकेत

कोल्हापूर / यश रुकडीकर : मार्केट यार्ड, कोल्हापूर येथील धनश्री ट्रेडर्स अँड कमिशन एजंट या दुकानात रवींद्र पंडित सनगर हे दिवाण म्हणून कामाला आहेत. दि.३०/६/२०२२ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एक महिला दुकानात आली. मला पैशाची गरज आहे असे सांगत तिने स्वतः कडील मोबाईल फोन हा विकायचा आहे असे सांगितले. सनगर यांनी मोबाईलची पाहणी केली व फोन नादुरुस्त आहे असे त्या महिलेस सांगितले. महिलेने माझे पती बाहेर आहेत त्यांना फोन दाखवा असे सांगितले.

सनगर जेव्हा त्या महिलेच्या पतीला फोन दाखवायला गेले तेव्हा त्या महिलेने पैशाच्या ड्रॉवर मधून १ लाख ३९ हजार काढून घेऊन पळ काढला. दिवाणजी दुकानात आल्यावर त्यांना ड्रॉवर उघडा असल्याचे लक्षात आले. त्या ड्रॉवर मधील रोख रक्कम दिसत नसल्याने तेव्हा चोरी झाल्याचे दिवाणजीच्या लक्षात आले. ह्या चोरी बद्दलची तक्रार त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाणे येथे केली.

शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आसपासच्या भागात सीसीटीव्ही नसल्याने शोध मोहिमेत अडचणी येत होत्या. त्या दरम्यान गोपनीय बातमीदाराकडून पथकास माहिती मिळाली की राजेंद्र नगर येथे भाड्याने राहणाऱ्या एका जोडप्याने हा गुन्हा केला असून हे जोडपे गुन्हा घडलेल्या वेळेपासून फरार आहे.

दि.२/८/२०२२ रोजी शोध पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की हे जोडपे मध्यवर्ती बसस्थानक येथून गोव्याला जाणार आहे. गुन्हे शोध पथकाने मध्यवर्ती बसस्थानक येथे सापळा रचला असता सदर जोडपे दिसले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपले नाव १) निता अभिषेक महाडिक उर्फ बन्नी शेख वव २२ २) अभिषेक दिपक महाडिक वव २४ दोघे राहणार राजेंद्र नगर असे सांगितले. अधिक चौकशी केली असता त्यांनी मार्केट यार्ड येथील एका दुकानात चोरी केल्याचे कबुली दिली. त्यांच्याकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

सदरची कारवाई शाहूपुरी पोलिस ठाण्यातील सहा.पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले, ऋषिकेश पवार, युवराज पाटील, मिलिंद बांगर, शुभम संकपाळ, लखन पाटील, सागर माने, राहुल कांबळे, शिल्पा आडके यांनी केली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय