Wednesday, May 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड : आप च्या वतीने कोपरा सभेस प्रारंभ, निवडणूकीची रणधुमाळी सुरू..!

पिंपरी चिंचवड : आप च्या वतीने कोपरा सभेस प्रारंभ, निवडणूकीची रणधुमाळी सुरू..!

पिंपरी चिंचवड : आम आदमी पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक 21 आकुर्डी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक बंटीग्रुप बिल्डिंग समोर आकुर्डी या प्रभागातील इच्छुक उमेदवार वैजनाथ शिरसाट यांच्या प्रचारार्थ कोपरा सभा पार पडली.

यावेळी बोलताना वैजनाथ शिरसाट यांनी प्रभागातील अनेक समस्यांची पोलखोल केली. त्यांनी सांगितले, आम आदमी पार्टीची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्ता आल्यास महापालिकेत उच्चदर्जाच्या शाळा, 24 तास मोफत पाणी देण्यात येईल, महिलांसाठी बस फ्री करण्यात येईल, शास्तिकराचा विषय कायमचा मार्गी लावण्यात येईल. महागाईने जनता मेटाकुटीला आलेली आहे. येणाऱ्या काळात ही जनता भाजपला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले.

वैजनाथ शिरसाट गेली पंधरा वर्षे त्या प्रभागांमध्ये सामाजिक कार्य करत आहेत, त्यांना स्थानिकांसह ओबीसी समाजाचा मोठा पाठिंबा या भागांमधून आहे. ते ओबीसी संघर्ष सेना पिंपरी-चिंचवड संघटनेचे अध्यक्ष आहेत.

या वेळी आपचे प्रवक्ते प्रकाश हगवणे म्हणाले, एकेकाळी श्रीमंतीचा रुबाब असणारी महानगरपालिका सत्ताधाऱ्यांच्या कोट्यावधीच्या घोटाळ्यामुळे भिकेचे डोहाळे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्ताधारी आणि विरोधक आणि प्रशासक या महानगरपालिकेमध्ये यांचे लागेबांधे आहेत. ‘अंदर की एक बात है, हम सब एक है’ अशाप्रकारे विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांच्या हातात हात घालून फिरत असतात. अनेक कामाच्या निविदा वाजवी दरात करून त्यामधून टक्केवारीचे गणित सांभाळणे हा उद्योग ह्या महानगरपालिकेमध्ये सर्रास चालू असल्याचा गंभीर आरोपही यावेळी केला. तसेच अनेक कंत्राटदार महानगरपालिकेच्या कामामुळे गर्भ श्रीमंत झाले आहेत. आपची महापालिकेत सत्ता आली तर हा भ्रष्टाचार मोडीत काढला जाईल, असेही ते म्हणाले.

यावेळी शहर आप उपाध्यक्ष महेश बिराजदार, कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, स्वप्नील जवळे, यल्लाप्पा वालदोर, गोविंद माळी, चंद्रमणी जावळे, सरोज कदम आदी पदाधिकाऱ्यांनी भाजपावर टिकास्त्र सोडले.

यावेळी आम आदमी पार्टी पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष वहाब शेख, आप नेते कपिल मोरे, आप पिंपरी चिंचवड डॉक्टर विंग अध्यक्ष अमर डोंगरे, चांद मुलानी, सतीश नायर, ब्रह्मानंद जाधव, अजय सिंग, शशिकांत कांबळे, सरफराज मुल्ला, देवेंद्र यादव, कुणाल वक्ते आजिनाथ सकटनाय, संतोषी नायर, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सीमा यादव यांनी आभार व्यक्त केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय