Saturday, May 4, 2024
Homeकृषीअतिवृष्टीची हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्या किसान सभेची मागणी

अतिवृष्टीची हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्या किसान सभेची मागणी

अतिवृष्टी नुकसान भरपाई, वन जमिन, घरकुल, रस्ते बाबत किसान सभा आक्रमक – ३१ जुलै रोजी तालुक्याभरात आंदोलन

इस्लामपुर : गेल्या आठवड्याभरात पावसाने हाहाकार माजवला असुन प्रचंड अतिवृष्टीने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नदी नाल्या लगतची शेती खरडून निघाली आहे, आसमानी आणि सुलतानी संकटात शेतकरी सापडले असतांना अजूनही प्रशासनाकडुन पंचनामे पूर्ण झालेले नसल्याचे अखिल भारतीय किसान सभेने म्हटले आहे.

इस्लापुर येथे हुतात्मा स्मारक भवनात किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ. शंकर सिडाम यांच्या अध्यक्षतेखाली आणि कॉ.अर्जुन आडे यांच्या प्रमुख उपस्थित किसान सभेचा शेतकरी मेळावा संपन्न झाला. इस्लामपुर, जलधरा, शिवणी, अप्पारापेठ मंडळात रेकार्ड पावसाची नोंद झालेली आहे, संपूर्ण शेती पिकांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान झालेले असताना राज्य शासनाकडून तातडीने मदत जाहीर करण्याची आवश्यता असताना सत्तेसाठी काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेलच राजकारण सरकार करत असुन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा सुर या मेळाव्यातून निघाला.

शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी तातडिणे ५० हजार हेक्टरी मदत जाहीर करा या प्रमुख मागणीसह, अतिवृष्टीने अनेक घरांची झालेली पडझड, पशू – जनावरे दगावली त्याची नुकसान भरपाई, वन जमिन कसत असलेल्या शेतकऱ्यांना वन अधिकार कायद्याची ठोस अंमलबजावणी करा, गावा गावात वंचित राहिलेल्या गरजुनां पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करा तथा घरकुलाची अनुदान रक्कम ५ लाख पर्यंत करा, गावा गावाला जोडणारी बांधकाम विभाग, जिल्हा परिषद अंतर्गत येणारी सर्व रस्ते, पुले तातडीने बांधा, शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करुन हमी भावाचा केद्रींय कायदा करा या मागण्यासाठी तालुक्याभरात इस्लामपुर, बोधडी, मांडवी, किनवट इत्यादी ठिकाणी ३१ जुलै रोजी जोरदार आंदोलन करण्याचा निर्धार मेळाव्यात करण्यात आला. अन्याथा हजारो शेतकऱ्यांना घेऊन जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा यावेळी किसान सभेचे नेते कॉ.अर्जुन आडे यांनी दिला.

या मेळाव्यात शंकर सिडाम, तुकाराम व्यवारे, तानाजी राठोड, अनिल आडे, शेषराव ढोले, खंडेराव कानडे, नारायण वानोळे, कोंडबाराव खोकले, अडेलु बोनगीर, मारोती फोले मंचावर उपस्थित होते. तर आनंद लव्हाळे, राम कंडले, किशन देशमुख, दिलिप तुमलवाड, शिवाजी किरवले, अंबर चव्हाण, यंशवंत राठोड, स्टॅलिन आडे, गंगाराम गाडेकर, साईनाथ राठोड, अजय आडे, अरुन चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय