घोडेगाव (दि.२७) : आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, जुन्नर येथे प्रवेश अर्ज केलेल्या १७० मुलींना वसतिगृह प्रवेश मिळावा या मागणीसह आश्रमशाळा व वसतिगृहांच्या विविध मागण्यांना घेऊन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या वतीने दि.२७ पासून प्रकल्प कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. (Ghodegaon)
या आंदोलनाचे नेतृत्व स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया चे राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ, जिल्हा अध्यक्ष दिपक वाळकोळी, जिल्हा सचिव नवनाथ मोरे, जिल्हा उपाध्यक्ष अक्षय निर्मळ, जिल्हा सहसचिव समीर गारे, सचिव मंडळ सदस्य राजू शेळके, जुन्नर तालुका सचिव अक्षय घोडे, आंबेगाव तालुका अध्यक्ष रोहिदास फलके, निकिता मेचकर , मयूर हिले हे करत आहेत.
ऑक्टोबर , २०२४ मध्ये झालेल्या आंदोलनास प्रकल्प अधिकारी मा.प्रदिप देसाई यांनी लेखी आश्वसन दिले होते कि, डिसेंबर, २०२४ अखेर जुन्नर येथील विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात येईल. मात्र मागील तीन महिने लोकप्रतिनिधींच्या पातळीवर व प्रकल्पाच्या पातळीवर वारंवार पाठपुरावा, चर्चा करून देखील अद्यापही या १७० विद्यार्थिनींना वसतिगृह प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे एसएफआय नेतृत्वाखाली या विद्यार्थींनी कालपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना सोमनाथ निर्मळ म्हणाले कि , ‘विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करून शिक्षण घ्यावे लागत आहे. असे असतानाही शैक्षणिक वर्षे संपत आले तरी विद्यार्थीनी वसतिगृहापासून वंचित आहेत. लेखी आश्वासन देऊनही ते पाळले जात नाही, त्यामुळे जुन्नर येथील १७० विद्यार्थीनी प्रवेश दिला जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहिल.’ असा इशारा यावेळी त्यांनी दिला. दिपक वाळकोळी म्हटले कि, ‘एसएफआय नेहमी विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढत आलेली आहे. यापुढेही लढत राहिल. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी एकत्र येऊन प्रवेशाची लढाई लढायची आहे.’(Ghodegaon)
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या –
१२) पुणे जिल्ह्यासाठी वसतिगृह प्रवेश क्षमता ७००० करण्यात यावी.
१३) शैक्षणिक वर्ष – २०२४ -२५ मध्ये आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, जुन्नर येथील वसतिगृहासाठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थिनींना वसतिगृह प्रवेश देण्यात यावा. यासोबतच इतर वसतिगृहासाठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश देण्यात यावा.
१४) एकलव्य कुशल पोर्टल वर अद्याप देखील MSCIT, Tally, Typing, JEE,NEET या कोर्स चा अद्याप देखील समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यास अडचणी येत आहेत. तरी आपण याबाबत मा.आयुक्त नाशिक यांच्याकडे पाठपुरावा करून हे कोर्स यामध्ये समाविष्ट करावेत व त्यांनी दिलेल्या लेखीच्या अनुषंगाने अंमलबजावणी करावी.
१५) आश्रमशाळा व वसतिगृहातील पायाभूत सुविधांचा प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावा.
- आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, मंचर येथील पाणी प्रश्न, इतर वसतिगृहातील जाणारे रस्ते, संगणक कक्ष, अभ्यासिका आणि जिम चे साहित्य, खेळाचे साहित्य, स्वच्छता प्रश्न व वसतिगृहामध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन करणेसाठी कचराकुंडी इत्यादी उपलब्ध करून द्यावे.,
१६) आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह जुन्नर येथील नव्याने बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून मुलांना तिथे निवासासाठी स्थलांतरीत करण्यात यावे.
१७) शून्य फी शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांकडून वर्षानुवर्षे घेतलेली फी परत करण्यात यावी.
१८) सेन्ट्रल किचन व्यवस्था बंद करून पूर्वीप्रमाणे मेस पद्धत सुरु करण्यात यावी.
१९) थकीत शिष्यवृत्ती व स्वयंम डीबीटी वितरीत करण्यात यावी.
२०) आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, घोडेगाव साठी मंजूर असलेल्या शासकीय इमारतीचे बांधकाम सुरक्षित ठिकाणी लवकरात लवकर करण्यात यावे.
२१) आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह येथील महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता तयार करण्यात यावा. मुलांचे व मुलींचे वसतिगृह, शिनोली येथील वसतिगृहाकडे जाण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करण्यात यावे.
Ghodegaon
हे ही वाचा :
जमिनीच्या वादातून महिलेच्या अंगावर घातला ट्रॅक्टर, महिलेचा जागीच मृत्यू
ऑनलाईन गेमिंगमुळे 17 वर्षीय तरुणीची हाताची नस कापून गळ्यावर जखम
धक्कादायक : अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून, मारून टाकण्यासाठी दिली 100 रुपयांची सुपारी
पुण्यात समलिंगी व्यक्तींना निर्जन स्थळी बोलवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक : 12 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
‘यापेक्षा चांगलं, टपरी टाक…’, शार्क टँक इंडियाचे जज अनुपम मित्तल संतापले? वाचा काय आहे प्रकरण
ब्रेकिंग : काँग्रेस नेत्याच्या घरी ५० लाखांची चोरी; रोख रक्कम, मौल्यवान वस्तू लंपास
पुण्यात बेरोजगारीचे भीषण वास्तव ; 50 जागांसाठी 5,000 उमेदवारांची गर्दी, व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्राला ४८ जणांना ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक
जगातील सर्वात उंच पुलावरून धावली ‘वंदे भारत एक्सप्रेस