Shark Tank India Season 4 : पॉप्युलर बिझनेस शो शार्क टँक इंडिया चा चौथा सीझन सध्या चर्चेत आहे. अनेक नवउद्योजक आपले स्टार्टअप आयडिया घेऊन शोमध्ये सहभागी होत आहेत. काहींना गुंतवणूक मिळत आहे, तर काहींना जजांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. (Anupam Mittal)
अलीकडेच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये, मेक माई पेमेंट या स्टार्टअपचे फाउंडर विजय निहालचंदानी यांनी आपला व्यवसाय सादर केला. विजय आपल्या पत्नी, भावासह सहकारी फाउंडर्ससोबत शोमध्ये आले होते. त्यांनी आपल्या कंपनीतील 3% हिस्सेदारीसाठी 30 लाख रुपयांची मागणी केली. मेक माई पेमेंट हा डिफॉल्टर देनदारांना ऑटोमेटेड पेमेंट रिमाइंडर पाठवणारा एक अॅप आहे.
काय म्हणाले अनुपम मित्तल (Anupam Mittal) ?
शादी डॉट कॉमचे संस्थापक आणि शार्क टँक जज अनुपम मित्तल (Anupam Mittal) यांनी मेक माई पेमेंटच्या (Make My Payment) युजर्सची संख्या विचारली असता, विजय यांच्या पत्नीने सांगितले की 3500 साइनअप्समधून केवळ 200 लोकांनी पेमेंट केले आहे. यावर मित्तल यांनी म्हटले, “तुम्ही दरमहा केवळ 30,000 रुपये कमावत आहात. त्यापेक्षा एखादी टपरी टाका अधिक फायद्याचे ठरेल.”
एमक्योर फार्मास्युटिकल्सच्या एग्जीक्यूटिव डायरेक्टर नमिता थापर यांनीही अॅपच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्यानुसार, “पेमेंट डिफॉल्टरला ऑटोमेटेड मेसेज फारसा परिणाम करणार नाही, कारण तो सहजगत्या नंबर ब्लॉक करू शकतो.”
बोट लाइफस्टाइलचे सीएमओ अमन गुप्ता यांनी निहालचंदानी यांना विचारले की ते आणखी कोणते व्यवसाय करतात. विजय यांनी सांगितले की ते सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहेत आणि त्यांना इंस्टाग्रामवर 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. याशिवाय ते एक फायदेशीर हॉटेल बुकिंग व्यवसायही चालवतात.
लेंसकार्टचे पीयूष बन्सल यांनी त्यांच्या इंस्टाग्राम कमाईबद्दल विचारल्यावर, विजय यांनी दरमहा 5 लाख रुपयांची कमाई होत असल्याचे सांगितले. यावर बन्सल प्रभावित झाले, मात्र इतर जज अजूनही त्यांच्या व्यवसायाच्या संकल्पनेबद्दल सकारात्मक दिसले नाहीत.
हा एपिसोड प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. विजय निहालचंदानी यांचा व्यवसाय आयडिया आणि जजांचा प्रतिसाद सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


हे ही वाचा :
कोण आहे अनुपम मित्तल ? वाचा यांचा जीवनप्रवास
पुण्यात बेरोजगारीचे भीषण वास्तव ; 50 जागांसाठी 5,000 उमेदवारांची गर्दी, व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्राला ४८ जणांना ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक
जगातील सर्वात उंच पुलावरून धावली ‘वंदे भारत एक्सप्रेस’
Airtel, Jio आणि Vi चे कॉलिंगसाठी नवे प्लॅन लाँच, वाचा सर्वात स्वस्त प्लॅन कोणता
सामान्य नागरिकांना महागाईचा झटका ; बस, टॅक्सी आणि रिक्षाच्या प्रवास भाड्यात वाढ
पुण्यात भीषण अपघात! नियंत्रण सुटलं; डंपरखाली दोन तरुणींचा मृत्यू
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची गळा दाबून हत्या ; पतीला जन्मठेप