Pune Same-sex Relationship : पुण्यात समलिंगी संबंध ठेवणाऱ्या किंवा संबंध ठेवण्यास इच्छुक व्यक्तींना निर्जन स्थळी नेऊन लुटणाऱ्या टोळीचा नांदेड सिटी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी भारत किसन धिंडले (वय 18, रा. सांगळे घाट, धायरी) याच्यासह आणखी दोन अल्पवयीन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. (Pune gay robbing)
Gay Dating & Chat – Apps चा वापर करून फसवणूक
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सोशल मीडियाचा (Gay Dating & Chat – Apps) वापर करून समलिंगी व्यक्तींशी संपर्क साधत असत. सुरुवातीला गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन केला जात असे आणि निसर्गाच्या सानिध्यात भेटायला बोलावले जाई. यानंतर ठरलेल्या निर्जन ठिकाणी पीडित पोहोचल्यावर आरोपींचे साथीदार तेथे येत आणि लुटमारीचा प्रकार घडवत असत. रोख रक्कम, मोबाईल आणि यूपीआयद्वारे पैसे हस्तांतरित करून आरोपी पीडिताला घटनास्थळी सोडून देत असत.
32 वर्षीय व्यवसायिकाची फसवणूक (Pune gay robbing)
14 जानेवारी रोजी डीएसके विश्व शाळेजवळ एका 32 वर्षीय व्यवसायिकाला अशाच प्रकारे लुटले गेले. तक्रारदार व्यवसायिकाला एका तरुणाने सोशल मीडियाद्वारे संपर्क करून बोलावले. त्याच्या विश्वासावर व्यवसायिक ठरलेल्या ठिकाणी गेला, जिथे तीन जणांनी मिळून त्याच्यावर लुटमारी केली. या प्रकारामुळे व्यवसायिक हादरून गेला होता, मात्र पोलिसांनी त्याला धीर दिला आणि तक्रार दाखल केल्याने आरोपींना पकडण्यात यश आले.
समलिंगी व्यक्तींना समाजात अद्यापही प्रतिष्ठा मिळत नसल्याने त्यांना आपली ओळख लपवावी लागते. त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्हेगारांना फसवणूक करण्याची संधी मिळते. पीडित व्यक्ती समाजात अपमान होईल या भीतीने तक्रार देण्याचे टाळतात, ज्याचा गुन्हेगार फायदा घेतात.
नांदेड सिटी पोलिसांनी या टोळीविरोधात सापळा रचून यशस्वी कारवाई केली असून, नागरिकांनी अशा प्रसंगी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे अशा गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होईल.


हे ही वाचा :
धक्कादायक : 12 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
‘यापेक्षा चांगलं, टपरी टाक…’, शार्क टँक इंडियाचे जज अनुपम मित्तल संतापले? वाचा काय आहे प्रकरण
ब्रेकिंग : काँग्रेस नेत्याच्या घरी ५० लाखांची चोरी; रोख रक्कम, मौल्यवान वस्तू लंपास
पुण्यात बेरोजगारीचे भीषण वास्तव ; 50 जागांसाठी 5,000 उमेदवारांची गर्दी, व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्राला ४८ जणांना ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक
जगातील सर्वात उंच पुलावरून धावली ‘वंदे भारत एक्सप्रेस