Nashik : नाशिक जिल्ह्यातील अभोणा (Abhona) येथील गोळाखाल (Golakhal) येथे जमिनीच्या वादातून एका महिलेसोबत अमानुष कृत्य करण्यात आले. या घटनेत जिजाबाई पवार (वय 47) या महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालून ठार मारण्यात आले. या भयानक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
देविदास पवार यांनी आपल्या विधवा बहिणीच्या वाटणीतील दोन एकर जमीन आपल्याला मिळावी, अशी मागणी नातेवाईकांकडे केली होती. यावरून वाद उफाळून आला आणि संतप्त हेमंत सुरेश पवार याने जिजाबाई पवार यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या जिजाबाई पवार यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी हेमंत पवार फरार
घटनेनंतर आरोपी हेमंत सुरेश पवार घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास अभोणा पोलीस करत असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून मृतक जिजाबाई यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ही घटना जमिनीच्या वादातून होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचे भयावह वास्तव उघड करत असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज आहे.
Nashik


हे ही वाचा :
ऑनलाईन गेमिंगमुळे 17 वर्षीय तरुणीची हाताची नस कापून गळ्यावर जखम
धक्कादायक : अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून, मारून टाकण्यासाठी दिली 100 रुपयांची सुपारी
पुण्यात समलिंगी व्यक्तींना निर्जन स्थळी बोलवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक : 12 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
‘यापेक्षा चांगलं, टपरी टाक…’, शार्क टँक इंडियाचे जज अनुपम मित्तल संतापले? वाचा काय आहे प्रकरण
ब्रेकिंग : काँग्रेस नेत्याच्या घरी ५० लाखांची चोरी; रोख रक्कम, मौल्यवान वस्तू लंपास
पुण्यात बेरोजगारीचे भीषण वास्तव ; 50 जागांसाठी 5,000 उमेदवारांची गर्दी, व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्राला ४८ जणांना ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक
जगातील सर्वात उंच पुलावरून धावली ‘वंदे भारत एक्सप्रेस