Heart Attack student Indore : इंदूर जिल्ह्यातील लासुदिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. शाळेत आठवीत शिकणाऱ्या 12 वर्षीय विद्यार्थ्याचा शर्यतीदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. टाना येथील शाळेत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुब्रत नावाचा विद्यार्थी धावत असताना अचानक जमिनीवर कोसळला.
student Heart Attack शाळेत शोककळा
घटनेची माहिती मिळताच शाळेतील शिक्षकांनी तत्काळ मुलाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुब्रतच्या अचानक जाण्यामुळे शाळेत शोककळा पसरली असून नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
सुब्रत त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता, त्यामुळे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. अतिरिक्त डीसीपी राजेश दंडोटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा हृदयाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असण्याची शक्यता आहे. मात्र, कुटुंबीयांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला आहे.
हृदयविकाराच्या झटक्याने लहान मुलांचे मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, जे अत्यंत चिंताजनक आहे. याआधीही अशा घटना घडल्या असून, शाळांमध्ये मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज अधोरेखित होते.


हे ही वाचा :
‘यापेक्षा चांगलं, टपरी टाक…’, शार्क टँक इंडियाचे जज अनुपम मित्तल संतापले? वाचा काय आहे प्रकरण
ब्रेकिंग : काँग्रेस नेत्याच्या घरी ५० लाखांची चोरी; रोख रक्कम, मौल्यवान वस्तू लंपास
पुण्यात बेरोजगारीचे भीषण वास्तव ; 50 जागांसाठी 5,000 उमेदवारांची गर्दी, व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्राला ४८ जणांना ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक
जगातील सर्वात उंच पुलावरून धावली ‘वंदे भारत एक्सप्रेस’
Airtel, Jio आणि Vi चे कॉलिंगसाठी नवे प्लॅन लाँच, वाचा सर्वात स्वस्त प्लॅन कोणता
सामान्य नागरिकांना महागाईचा झटका ; बस, टॅक्सी आणि रिक्षाच्या प्रवास भाड्यात वाढ
पुण्यात भीषण अपघात! नियंत्रण सुटलं; डंपरखाली दोन तरुणींचा मृत्यू