Pune unemployment : नोकरीच्या शोधात तरुण-तरुणींची वाढती हतबलता आणि बेरोजगारीची विदारक परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील बेरोजगारीचे भयावह वास्तव दिसून आले आहे.
मगरपट्टा भागातील एका कंपनीने 50 रिक्त पदांसाठी वॉक-इन इंटरव्ह्यूची जाहिरात दिली होती. या मुलाखतींसाठी तब्बल 4,000 ते 5,000 उमेदवार हजर झाले. कंपनीच्या बाहेर प्रचंड मोठ्या रांगा लागल्या होत्या. तरुण-तरुणी हातात बायोडेटा घेऊन आपली वेळ येण्याची वाट पाहत होते. उमेदवारांची गर्दी इतकी वाढली की रस्त्यावरही जागा उरली नाही.
पुण्यातील भीषण बेरोजगारीचा व्हिडिओ व्हायरल (Pune unemployment)
यामुळे आयटी क्षेत्रातील नोकरीच्या तुटवड्याचे भीषण चित्र समोर आले आहे. पुण्यात नोकऱ्यांची चुरस किती तीव्र आहे, हे या घटनेने अधोरेखित केले आहे. आयटी क्षेत्रातील पगार कमी होणे, वाढलेले तास, आणि नोकऱ्यांवरील अनिश्चितता यामुळे तरुण वर्ग चिंतेत आहे.
सामाजिक माध्यमांवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओने महाराष्ट्रातील बेरोजगारीच्या समस्येला पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. सध्या पुण्यासारख्या प्रगत शहरातही नोकरीसाठी हजारोंच्या संख्येने उमेदवारांची अशी गर्दी पाहायला मिळतेय, ही बाब अधिक चिंताजनक आहे. तरुणाईला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.


हे ही वाचा :
जगातील सर्वात उंच पुलावरून धावली ‘वंदे भारत एक्सप्रेस’
Airtel, Jio आणि Vi चे कॉलिंगसाठी नवे प्लॅन लाँच, वाचा सर्वात स्वस्त प्लॅन कोणता
सामान्य नागरिकांना महागाईचा झटका ; बस, टॅक्सी आणि रिक्षाच्या प्रवास भाड्यात वाढ
पुण्यात भीषण अपघात! नियंत्रण सुटलं; डंपरखाली दोन तरुणींचा मृत्यू
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची गळा दाबून हत्या ; पतीला जन्मठेप
हनीमुनपूर्वी सासरच्यांकडून वधूची व्हर्जिनीटी टेस्ट, न्यायालयाचा मोठा दणका
भंडाऱ्यातील कंपनीत भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू, अनेक कर्मचारी गंभीर जखमी