अनैतिक गोष्टी करत असल्याबाबत असल्याबाबत पोलीस आयुक्तांना संजीवन सांगळे यांचे निवेदन (PCMC)
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – चिखली, मोशी परिसरामध्ये काही ठिकाणी देह विक्री (वेश्या व्यवसायासाठी ) काही महिला राजरोस पणे रोडवरती उभ्या असतात, हे असभ्य आणि गंभीर आणि सभ्य सामाजिक संस्कृतीला धोकादायक आहे. (PCMC)
आपणाला कळविण्यात येते की, चिखली, मोशी मधील मोशी- आळंदी रोडवरील अक्षा एम्पायर सोसायटी समोर असणाऱ्या पेट्रोल पंपाजवळ, तसेच रिव्हर रेसिडेन्सीच्या ते कोलसिस ग्रीन सोसायटीच्या रोडवरती व या आजूबाजूला मोकळ्या जागेमध्ये रात्रीच्या वेळी काही महिला देह विक्रीसाठी उभ्या राहतात.
याबाबत आपल्या पोलीस प्रशासनाकडून याकडे डोळेझाक केली जाते. सामाजिक दृष्टिकोनातून या सर्व रोडवरती चालू असणाऱ्या गोष्टीमुळे या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे.
तरी कृपया आपल्या स्तरावरून या भागातील संबंधित पोलीस स्टेशनला, पोलीस अधिकाऱ्यांना कडक सूचना देऊन या घटना लवकरात लवकर बंद कराव्यात. अशी मागणी संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली- मोशी-चऱ्होली- पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन यांनी पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. (PCMC)

प्रतिक्रिया:
चिखली -मोशी परिसरातील मोशी-देहू रोडवरील बऱ्याच चौकामध्ये सायंकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत अनेक महिला अशा प्रकारच्या उभ्या राहून देह विक्रीचा व्यवसाय करतात. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सोसायट्या आहेत, मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असताना देखील राजरोजपणे असे धंदे चालत असल्यामुळे या परिसरामध्ये राहणाऱ्या महिला भगिनी त्याचप्रमाणे मुलांना आणि इतरांना या गोष्टीचा खूप त्रास होत आहे तसेच हा अतिशय संवेदनशील विषय असल्यामुळे पोलीस प्रशासनाने यावर त्वरित कडक कारवाई करावी आणि हे धंदे बंद करावेत.
– संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली- मोशी-चऱ्होली- पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन
सदर निवेदनाच्या प्रती मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार महेश लांडगे यांना पाठवण्यात आल्या आहेत.