Thursday, December 5, 2024
Homeताज्या बातम्याMaharashtra CM : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? शपथविधीची जोरदार तयारी

Maharashtra CM : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? शपथविधीची जोरदार तयारी

मुंबई : महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री आणि नव्या महायुती सरकारचा शपथ विधी मुंबईतील आझाद मैदानावर ५ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सरकारचा शपथविधी होणार आहे. आझाद मैदानावर ‘महा’शपथविधीची मोठी तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याआधी. ४ डिसेंबर रोजी भाजपच्या विधिमंडळ नेत्याची निवड होणार आहे. (Maharashtra CM)

दरम्यान, पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “आझाद मैदानावर आम्ही सर्वांनी पाहणी केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि विधान परिषदेतील गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी सोमवार, दि. २ डिसेंबर रोजी आझाद मैदानावरील शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधानांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह केंद्र आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुतीला भरघोस मतदान करून त्यांची मते निर्णायक ठरली आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. भाजपच्या मुंबईतील आमदारांवर शपथविधी सोहळ्याची प्रमुख जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यादृष्टीने मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांनी सोमवारी या भव्य सोहळ्याच्या तयारी संदर्भात माहिती दिली.

Maharashtra CM

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 690 जागांसाठी भरती

जुन्नर : श्रेयश कदमची राष्ट्रीय हॅण्डबॉल स्पर्धसाठी निवड

ईडीने पोर्न निर्मितीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणावर राज कुंद्राच्या घरावर छापे टाकले

PCMC : औद्योगिक गुणवत्ता स्पर्धा २०२४ मध्ये ३५ कंपन्यांतील ३०७ स्पर्धकांचा सहभाग

Cold wave : महाराष्ट्रात थंडीची लाट, पुणे 9.9°C

संबंधित लेख

लोकप्रिय