Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडSHANKAR JAGTAP : "सर्वांच्या साथीने; चिंचवड विधानसभेचा विकास करूया गतीने", आमदार अश्विनी...

SHANKAR JAGTAP : “सर्वांच्या साथीने; चिंचवड विधानसभेचा विकास करूया गतीने”, आमदार अश्विनी जगताप यांची साद

पिंपळे गुरवमध्ये अश्विनी जगताप यांचा झंझावाती प्रचार दौरा (SHANKAR JAGTAP)

महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या महाविजयाचा पिंपळे गुरववासीयांनी बांधला चंग

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आमदार अश्विनी जगताप यांनी पिंपळे गुरव, प्रभाग क्र.२९ मधील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शंकर जगताप यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांचे विकासाचे वचन जनतेसमोर मांडले आणि मतदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच “सर्वांच्या साथीने; चिंचवड विधानसभेचा विकास करूया गतीने” या विचारधारेखाली त्यांनी नागरिकांना शंकर जगताप यांच्या रूपात एक जबाबदार आणि कर्तव्यदक्ष प्रतिनिधी मिळेल, यासाठी आश्वस्त केले. (SHANKAR JAGTAP)

चिंचवड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आमदार अश्विनी जगताप यांनी पिंपळे गुरव प्रभागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी सुदर्शन नगर, वैदू वस्ती, गुलमोहोर कॉलनी, साईनाथ नगर, तुळजाभवानी नगर, गुरुदत्त नगर, गंगोत्री नगर, विजय नगर, शिवराम नगर, शिवदत्त नगर, सहकार नगर, भैरवनाथ नगर, प्रभात नगर, सृष्टी चौक, क्रांती नगर, जवळकर नगर, काशीद नगर, पिंपळे गुरव गावठाण परिसरातील नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या.

यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक शशिकांत कदम, सागर अंघोळकर, माजी नगरसेविका उषा मुंडे, चंदा लोखंडे, रमेश जगताप, रमेश काशीद, महेश जगताप, दीपक काशीद, राहुल जवळकर, कावेरी जगताप, शोभा जांभुळकर, अमर आदियाल, शशिकांत दुधारे, नितीन कदम, राजेश लोखंडे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (SHANKAR JAGTAP)

“चिंचवडच्या प्रगतीसाठी, आपल्या सर्वांची साथ हवी” अशी साद आमदार अश्विनी जगताप यांनी नागरिकांना घातली. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी या क्षेत्रात केलेले प्रयत्न आणि योगदानामुळे हा परिसर आज विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे यापुढेही असाच विकास अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना मोठे मताधिक्य देऊन त्यांना काम करण्याची संधी देण्याचे आवाहन आमदार अश्विनी जगताप यांनी केले.

या दौऱ्यादरम्यान अश्विनी जगताप यांनी स्थानिक महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांशी संवाद साधला. शंकर जगताप यांनी केलेल्या समाजोपयोगी कार्याचे महत्त्व पटवून दिले. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात चिंचवडमध्ये अधिक सकारात्मक बदल घडतील याची जाणीव करून दिली.

दरम्यान, आमदार अश्विनी जगताप यांच्या या प्रचार दौऱ्याला पिंपळे गुरवमधील रहिवाशांनी जोरदार स्वागत करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांचा विक्रमी मताधिक्याने महाविजय साकार करायचा, असा चंग आमदार अश्विनी जगताप यांच्या साक्षीने बांधला आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण

धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन जाहीर

नताशा स्टँकोविक हिचा हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा

शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून अश्लील व्हिडीओ शूट

गुन्हेगारी संपवू ,बेरोजगारी संपवू, विकासाचे सर्व प्रश्न हाताळू – रोहित पवार

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

धक्कादायक : सांगलीत कुऱ्हाडीने वार करून भाजप नेत्याची निर्घृण हत्या

अकोल्यातील सभेत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; गरिबांना पक्के घर देणार

महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा

फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर

संबंधित लेख

लोकप्रिय