Friday, November 8, 2024
Homeताज्या बातम्यामहायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा

महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा

Narendra modi : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज धुळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला महत्त्वपूर्ण आश्वासन दिले. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यास, पहिले पाऊल म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या दीर्घ सत्ताकाळात मराठी भाषेला हा मान न मिळाल्याचे नमूद करून मोदी म्हणाले, “डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.”

तसेच आता गुंतवणुकीसाठी देखील महाराष्ट्र पहिली पसंत राहिली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. मोदींनी नुकत्याच वाढवण बंदराच्या उद्घाटनाचा उल्लेख करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिसरात विमानतळासाठी व्यक्त केलेली मागणी लक्षात घेतली असून, महायुती सरकार येताच प्रथम त्या मागणीवर बैठक घेणार असल्याचे सांगितले. “महायुती सरकारच्या शपथविधीनंतर तातडीने वाढवण बंदर परिसरात नवीन विमानतळ उभारण्याबाबत निर्णय घेऊ,” असे मोदींनी आश्वासन दिले.

याशिवाय, महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना मोदी म्हणाले की, “महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाकं आहेत, ना ब्रेक; त्यातच त्यांच्या आत नेतृत्वावरही सतत वाद आहेत.” त्यांनी आरोप केला की, महाविकास आघाडीने राज्यातील महत्त्वाची विकासकामे थांबवली, मेट्रो आणि समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पांनाही अडथळा आणला.

मोदींच्या या भाषणामुळे महायुती सरकार आल्यास मराठी भाषेच्या मानवीकासह राज्याच्या विकासासाठी ठोस पावले उचलली जातील, असा संदेश जनतेपर्यंत पोहोचला आहे.

Narendra modi

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर

चार दिवसात सोयाबीनला अपेक्षित दर मिळेल ; भाजपच्या ‘या’ नेत्याची घोषणा

शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा

ईडीच्या दबावामुळे भाजपसोबत गेले ; छगन भुजबळ यांचा खळबळजनक दावा समोर

नरेंद्र मोदींची राज्यातील नऊ सभांची मोहीम सुरू; महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार

मुंडे बहीण-भावावर प्रवीण महाजन यांच्या पत्नीचे गंभीर आरोप

महाविकास आघाडीने जनतेला दिली पाच मोठी आश्वासने; जाणून घ्या सविस्तर

मुख्यमंत्री शिंदेंच्या दहा मोठ्या घोषणा; राज्यातील बहिणींना मिळणार 2100 रुपये दरमहा

संबंधित लेख

लोकप्रिय