Chhagan Bhujbal : राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. “ईडीच्या दबावामुळे आपण भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला,” असे भुजबळ यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘2024 : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात भुजबळ यांच्या मुलाखतीतील हे दावे समोर आले आहेत.
भुजबळ यांच्या मते, ओबीसी असल्याने केंद्रीय तपास यंत्रणा आपल्यावर दबाव टाकत होत्या. त्यांनी सांगितले की, “मी उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते. दोन-अडीच वर्षे तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली. 100 कोटींच्या आरोपांवरून अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती. मलाही अशाप्रकारे अडकवण्याचा पुन्हा प्रयत्न सुरु होता. त्यामुळे आपण भाजपसोबत गेलो”, असं भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले होते.
या पुस्तकात भुजबळांनी अजित पवारांबाबत देखील काही खुलासे केले आहेत. साखर कारखान्याच्या विक्रीवरून अजित पवारांवर चौकशी सुरू झाल्याचे भुजबळांनी सांगितले. कारखान्यात सर्वाधिक भागभांडवल हे अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावे होते. कदाचित पत्नीला अटक होऊ शकते, असे अजित पवारांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळेच अजित पवारांनाही घाम फुटला होता.”, असं भुजबळ यांनी म्हटलं असल्याचं या पुस्तकात नमूद करण्यात आलंय.यामुळेच भाजपबरोबर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
भुजबळांच्या दाव्यानुसार, शरद पवारांना भाजपसोबत हातमिळवणी करायची नव्हती. मात्र, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात ईडीच्या कारवाया सुरू झाल्याने त्यांनी शरद पवारांशी चर्चा केली. शरद पवारांनी नकार दिल्यानंतर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी भाजपसोबत वाटाघाटी करण्याचा निर्णय घेतला.असा खुलासा भुजबळ यांनी केला असल्याचं पुस्तकात म्हटलं आहे.
दरम्यान, या दाव्यावर आता स्वतः छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी ते पुस्तक वाचले नाही. त्यात काय लिहिलेले आहे? हे नंतर पाहीन. आता सध्या माझे लक्ष प्रचारावर आहे. याबाबत आमच्या वकिलांशीही मी चर्चा करेन. निवडणुकीनंतर जे जे चुकीचे आहे, त्यावर मी नक्कीच कारवाई करेन. नको नको त्या गोष्टी माझ्या तोंडी घातल्या गेल्या, याला मी नक्कीच उत्तर देईन.”,असंही भुजबळ म्हणाले आहेत. पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण दिलं.
Chhagan Bhujbal
हेही वाचा :
नरेंद्र मोदींची राज्यातील नऊ सभांची मोहीम सुरू; महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार
मुंडे बहीण-भावावर प्रवीण महाजन यांच्या पत्नीचे गंभीर आरोप
महाविकास आघाडीने जनतेला दिली पाच मोठी आश्वासने; जाणून घ्या सविस्तर
तुमचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे ; संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर ; महाविकास आघाडीच्या ‘पाच गॅरंटी’ जाहीर करणार
मुख्यमंत्री शिंदेंच्या दहा मोठ्या घोषणा; राज्यातील बहिणींना मिळणार 2100 रुपये दरमहा
उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी दिली पाच मोठी आश्वासने
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर