Tuesday, December 3, 2024
Homeताज्या बातम्याउद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी दिली पाच मोठी आश्वासने

उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी दिली पाच मोठी आश्वासने

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोल्हापुरातील सभेत मोठी आश्वासने दिली आहेत. महाराष्ट्रातील जनतेला आश्वस्त केलं आहे. यामध्ये शिक्षण, महिला सुरक्षेसाठी पोलीस भरती, धारावी पुनर्विकास, शेतकऱ्यांना हमीभाव, आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवरील स्थिरता यांचा समावेश आहे.

1.मोफत शिक्षण : ठाकरे यांनी विद्यार्थिनींप्रमाणेच राज्यातील मुलांनाही मोफत शिक्षण दिलं जाईल, असं आश्वासन दिलं आहे. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधीसाठी समानता मिळेल.

2.महिला पोलीस आणि तक्रार सुविधा : महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचं पाऊल म्हणून महिला पोलीस आणि महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापन केले जातील, महिला पोलीस अधिकारी नियुक्त करून सुरक्षित आणि सुलभ तक्रार नोंदणीसाठी कार्यवाही करण्यात येणार आहे.असेही ठाकरे यांनी सांगितले.

3.अदानी प्रकल्प रद्द व धारावी पुनर्विकास : मुंबईतील अदानी प्रकल्प रद्द करून, धारावीतील रहिवाशांना उद्योग-धंद्यांसाठी आवश्यक सुविधा आणि घरे देण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.धारावी पुनर्विकासातून आर्थिक आणि सामाजिक स्थैर्याचं चित्र निर्माण केलं जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

4.शेतकऱ्यांसाठी हमीभाव : महाविकास आघाडीची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याच्या दिशेने पावलं उचलली जातील. यंदा सत्ता आल्यास शेतीमालाला हमीभाव मिळवून देण्याचं आश्वासन देत ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची ग्वाही दिली.त्यांच्या मते, महाविकास आघाडीची सत्ता पुन्हा आल्यास शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देण्यात येईल.

5.जीवनावश्यक वस्तूंचे स्थिर भाव :महाविकास आघाडी सरकार आल्यास पुढील पाच वर्षे डाळ, तांदूळ, साखर, आणि तेल यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचं उद्धव ठाकरे यांनी वचन दिलं आहे.डाळ, तांदूळ, साखर, तेल यासारख्या वस्तूंचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी ठोस पावलं उचलली जातील, असं ते म्हणाले.

या पाच आश्वासनांमुळे राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून, राज्यातील जनतेला नवीन अपेक्षांचं आश्वासन मिळालं आहे.

Uddhav Thackeray

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

दिवाळीनंतर सोनं झालं स्वस्त ; ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर

मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते;राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल

रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश

दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत

मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

संबंधित लेख

लोकप्रिय