Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडKokan sea food : रावस माशाचे कालवण

Kokan sea food : रावस माशाचे कालवण

सुरमई, पॉपलेट नंतर अतिशय लोकप्रिय रावस माशाचे मांस चवदार असल्याने तो मत्स्यप्रेमींच्या विशेष पसंतीचा आहे. या माशामध्ये ओमेगा-३ हे मेदाम्ल असते. हे मासे शक्यतो ताज्या स्वरूपात खाल्ले जातात. अतिरिक्त प्रमाणात सापडल्यास खारवून तसेच वाळवूनही खाल्ले जातात. (Kokan sea food)

भारतात पश्चिम किनाऱ्यावर रावस मासे पकडण्याचा हंगाम सप्टेंबर–नोव्हेंबर या काळात असतो, तर पूर्व किनाऱ्यांवर तो फेब्रुवारी–मे असा असतो. मोठ्या प्रमाणावर ह्यांची मासेमारी होत असल्याने त्यांच्या नैसर्गिक साठ्यांवर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे त्यांची शेती करण्याची गरज भासू लागली. सध्या सिंगापूर, तैवान व चीन येथे या माशांची शेती केली जाते.


रावस माशाची लांबी साधारणपणे १·८ मी. असून शरीर दोन्ही बाजूंनी चपटे असते. शरीराचा रंग रुपेरी असून पोट व दोन्ही बाजू पिवळसर पांढऱ्या रंगाच्या असतात. तोंड आकाराने मोठे असून दात लहान व थोडेसे ओठाबाहेर आलेले असतात. पृष्ठपर व पुच्छपर करडे असून त्यांवर काळे ठिपके असतात आणि त्यांच्या कडा काळ्या असतात. अधरपराचा व गुदपराचा अर्धा भाग नारिंगी असतो. अधरपराच्या पुढच्या बाजूस चार तंतुपर असतात. रावस मासा ओळखण्याची ही एक खूण आहे. नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. (Kokan sea food)

रावस मासा फ्राय आणि कालवण कोकण पर्यटन करताना अवश्य खावे. सुरमई, पॉप लेट नंतर थोडा कमी महागडा हा मासा आहे, साधारणता ३५० रुपये ते ६०० रुपये असा यांचा मार्केटचा दर असतो.

ऑक्टोंबर ते जानेवारी या काळात या माशाची मासेमारी जगभर होते. याला इंग्रजी मध्ये सोलमन या नावाने ओळखले जाते.

कालवण किंवा फिश फ्राय करताना ओला नारळ, हळद, लाल तिखट, धणे, कांदा, लसूण, आले, थोडी ओली हिरवी मिरची एकत्र करून पाट्यावर वाटण करून रावसची रेसिपी करावी, त्यामुळे जेवणाची चव अविट होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, सर्वत्र एकच खळबळ

मविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव

अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन

दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?

पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू

इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?

अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?

मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात

शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित

भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित

संबंधित लेख

लोकप्रिय