Tuesday, December 3, 2024
Homeताज्या बातम्याGas Cylinder Price: दिवाळीपूर्वीच महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून...

Gas Cylinder Price: दिवाळीपूर्वीच महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर

Gas Cylinder Price: 1ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी, गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांवर महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. यावेळी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये वाढ झाली असून, दिवाळीपूर्वीच व्यावसायिकांसाठी ही चिंतेची बाब ठरली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती सतत वाढत आहेत. ऑक्टोबर महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत तब्बल ₹94 ची वाढ झाली आहे. चेन्नईत आता व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ₹1903 वर पोहोचली आहे, तर कोलकातामध्ये या सिलिंडरचा दर ₹1850.50 आहे. मुंबईतही या सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली असून, आता व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर ₹1692.50 झाला आहे.

दिल्ली आणि मुंबईमध्ये देखील व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल ₹94.5 ची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, या वाढत्या दरांचा परिणाम व्यापार आणि उद्योगांवर मोठ्या प्रमाणात होणार आहे.

तथापि, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. मार्च 2024 पासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती स्थिर आहेत. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरचा दर ₹802.50 आहे, तर चेन्नईत हा दर ₹818.50 आहे.

दिवाळी आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, परंतु सध्या वाढलेल्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतींनी नागरिकांसह व्यापाऱ्यांनाही चिंता वाढवली आहे.

Gas Cylinder Price

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल

अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू

मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम

महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल

मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप

धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू

भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार

अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध

मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर

संबंधित लेख

लोकप्रिय