पुणे, २८: स्त्रियांना आपलं आयुष्य मुक्तपणे जगता यायला हवं, तिच्या मर्जीशिवाय तिच्या अंगाला हात लावायचे कुणी धाडस करता कामा नये, असा समाज अस्तित्वात आला तर मला माझ्या छोट्या मुलीचीही काळजी वाटणार नाही. या भावना व्यक्त केल्या सामान्य घरातल्या एका गृहिणीने. याला निमित्त होत ‘मेरी रातें मेरी सडके’ या महिला जागर समिती आयोजित उपक्रमाची दुसऱ्या रात्रीचे. शनिवार दि. 28 सप्टेंबर रोजी ‘जिजाऊ तुझ्या संस्काराने, भय इथले संपवायचे आहे’, या संकल्पनेवर ही रात्र साजरी करण्यात आली.(Pune)
प्रत्येकामध्ये एक कलाकार दडलेला असतो. मात्र स्त्रियांवरील वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांच्यातील कलाकार दबून जातो. ‘ती’च्यातील कलाकाराला बाहेर काढण्यासाठी, कलेच्या माध्यमातून तिला व्यक्त करण्यासाठी या उपक्रमाची ही दुसरी रात्र कलेला समर्पित करण्यात आली होती. पुण्यातील धनकवडीमधील तीन हत्ती चौकात पावसाने हजेरी लावलेली असतानाही स्त्री,पुरुष, युवक- युवती आणि लहान मुलांनी उत्साहात पोस्टरवर महिला अत्याचार, महिला सशक्तीकरण या विषयावर संदेश लिहिले, चित्र काढले. एवढंच नाही तर ते करताना त्यांच्या मनात काय भावना उमटत होत्या हेही त्यांनी यावेळी दिलखुलासपणे मांडल्या.
दिल्लीतील निर्भया प्रकरणाला यावर्षी 12 वर्ष होत आहेत. त्यानिमित्त महिला जागर समितीद्वारे ‘मेरी राते मेरी सडके’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. पुण्यात आणि राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये समितीद्वारे हा उपक्रम 21 सप्टेंबर पासून 14 डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात महाराष्ट्रातील विविध स्त्री संघटना आणि संस्था सहभागी होत आहेत, असे अभिव्यक्तीच्या समन्वयक अलका जोशी यांनी यावेळी सांगितले.
Pune
हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल
अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू
मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम
महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल
मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप
धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू
भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार
अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर