मुंबई : मुंबईतील मानखुर्दमधील मंडळ परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या परिसरात विविध प्रकारची गोडाऊन आहेत. या आगीमुळं परिसरात उंच धुराचे लोट दिसत आहेत. अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
मानखुर्दमधील मंडळ परिसरात तेलाची गोडाऊन, साबन बनवण्याचे कारखाने, कागद बनवणे, फर्निचर बनवण्याचे कारखाने यासह विविध प्रकारची गोडाऊन आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या सात ते आठ गाड्यांसह पोलीस आणि मुंबई पालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही आग भीषण स्वरूपाची असून लांबूनच मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दिसून येत आहेत.
वन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 20000 ते 40000 रूपये पगाराची नोकरी
मुंबईतील मानखुर्द परिसरात भीषण आग लागली आहे. भांगर येथील ४ गोदामांना आग/लागली. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी हजर, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. @mwardtweeting @mybmc @KishoriPednekar pic.twitter.com/X666hmbFTx
— ??.ℝ?? ???? (@Rajmajiofficial) June 9, 2022
दरम्यान, सुदैवाने आगीमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. नेमकी ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.
पुणे येथे 10 वी आणि 12 वी पास करू शकता अर्ज, BRO मध्ये 876 जागांसाठी भरती
भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 400 पदांसाठी भरती, 40000 रूपये पगाराची नोकरी
ठाणे ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत भरती, 25000 रूपये पगाराची नोकरी