Wednesday, January 15, 2025
Homeताज्या बातम्याRaj Thackeray : सुपारी फेकीच्या घटनेनंतर राज ठाकरेंची पत्रकार परिषद, माझ्या वाटेला...

Raj Thackeray : सुपारी फेकीच्या घटनेनंतर राज ठाकरेंची पत्रकार परिषद, माझ्या वाटेला जाऊ नका…

Raj Thackeray on Reservation : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मराठवाडा दौऱ्यात “माझ्या वाटेला जाऊ नका, नाहीतर राज्यात सभाही घेता येणार नाहीत,” असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. शनिवारी संभाजीनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली.

राज्यातील आरक्षणाच्या वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आरक्षण हे आर्थिक विषयावर असावं ही माझी पक्षाच्या स्थापनेपासूनची भूमिका आहे. इतकंच काय, महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही असंही माझं मत आहे, असं राज ठाकरे म्हणाले. पुढे ते म्हणाले, “माझ्या वाटेला जाऊ नका, नाहीतर राज्यात सभाही घेता येणार नाहीत, माझी पोरं काय करतील हे सांगता येत नाही.

शरद पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, “शरद पवार म्हणतात महाराष्ट्राचा मणिपूर होईल. पवारांनी मणिपूर होऊ नये म्हणून प्रयत्न करायला हवा, पण तेच मणिपूर होईल, असे म्हणत आहेत,” असा आरोप राज ठाकरे यांनी केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठवाड्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न होणार असल्याचाही दावाही त्यांनी केला.

Raj Thackeray

राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले की, कोणत्याही नेत्याच्या सभेला विरोध करू नका, परंतु “माझे पोरे काय करतील सांगता येत नाही,” असे म्हणत त्यांनी इशाराही दिला. “तुमच्याकडे प्रस्थापित असतील, तर माझ्याकडे विस्थापित आहेत,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : भारताला मोठा धक्का ; ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अंतिम फेरीतून अपात्र

साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू

BSNL लवकरच 5G आणणार, पहिला 5G व्हिडीओ कॉल यशस्वीरित्या

बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळले, फाईव्ह स्टार हॉटेल पेटवले

मोठी बातमी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिकेवर न्यायालयाचा मोठा निर्णय

मोठी बातमी : पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यानंतर शेख हसीना भारतात दाखल

संबंधित लेख

लोकप्रिय