Thursday, September 19, 2024
Homeजुन्नरमोठी बातमी : जुन्नर तालुक्यातील 10 बिबटे गुजरातला पाठवले

मोठी बातमी : जुन्नर तालुक्यातील 10 बिबटे गुजरातला पाठवले

Junnar Leopard : जुन्नर तालुक्यातील बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले 10 बिबट आज सायंकाळी गुजरातमधील जामनगर येथे स्थलांतरित करण्यात आले. 

उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे बिबटे जामनगरमधील ‘वनतारा प्राणीसंग्रहालय’ आणि पुनर्वसन केंद्रात पाठविण्यात आले आहेत. माणिकडोह येथून 4 मादी आणि 6 नर अशा एकूण 10 बिबट्यांना स्थलांतरित करण्याची योजना आखण्यात आली होती, ज्याला केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने मान्यता दिली होती.

बिबट्यांना (Junnar Leopard) स्थलांतरित करण्यासाठी तीन महाकाय वातानुकूलित ॲंब्युलन्सचा वापर करण्यात आला. एका ॲंब्युलन्समध्ये 5 बिबट वाहून नेण्याची क्षमता असून, अतितातडीच्या मदतीसाठी आणखी एक ॲंब्युलन्स सोबत ठेवण्यात आली. या ताफ्यात गुजरातमधील झू मॅनेजर, पशुवैद्यकीय अधिकारी, 23 मॅनेजमेंट टीमचे सदस्य आणि वनविभाग जुन्नरचे 15 अधिकारी कर्मचारी सहभागी होते.

 Junnar Leopard मानव-बिबट संघर्ष

जुन्नर तालुक्यात मानव-बिबट संघर्ष मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. या पार्श्वभूमीवर, वन विभागाने पिंपळवंडी, काळवाडी, लेंडेस्थळ, उंब्रज नंबर 1, उंब्रज नंबर 2 या गावांमध्ये 40 पिंजरे लाऊन 9 बिबट्यांना जेरबंद केले होते, आणि त्यांना माणिकडोह निवारा केंद्रात ठेवले होते. या केंद्राची क्षमता 44 बिबट्यांची असून सध्या त्याठिकाणी 54 बिबटे आहेत.

स्थानिक प्रशासन आणि वन विभागाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे या बिबट्यांचे यशस्वी स्थलांतर होऊ शकले आहे, ज्यामुळे जुन्नर तालुक्यातील लोकांना दिलासा मिळणार आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास

भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !

मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले

वायनाडमध्ये भीषण भूस्खलन ; ४५ ठार, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

‘त्या’ प्रकरणात अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक

१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का

Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा

कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी

गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर

महिलांच्या स्वावलंबनासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना

संबंधित लेख

लोकप्रिय