Friday, September 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडALANDI : उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त आळंदीत माऊलींना अभिषेक

ALANDI : उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त आळंदीत माऊलींना अभिषेक

आळंदीत गरजू पथारी विक्रेते यांना छत्री वाटप (ALANDI)

आळंदी / अर्जुन मेदनकर : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त आळंदी येथील शिवसेना ( उबाठा गट ) यांचे वतीने माऊलींची पूजा, करण्यात आली. (ALANDI)

श्रींचे चलपादुकांवर अभिषेक करून प्रार्थना करण्यात आली. येथील गरजू व सर्वसामान्य विक्रेते यांना पावसाळा असल्याने मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी माऊलींना साकडे घालण्यात आले. साहेबांच्या हातून अशीच देश सेवा अधिकाधिक व्हावी. राज्यामध्ये पक्षाची ताकद वाढवून पुन्हा एकदा विधानभवनावर भगवा फडकू दे असे माऊली चरणी सर्वांनी प्रार्थना करीत साकडे घातले.

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उत्तम गोगावले, आळंदी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, माजी नगरसेवक रमेश गोगावले, स्वराज ग्रुपचे आशिष गोगावले, मंगेश तिताडे, शशिकांत राजे जाधव, प्रकाश घुंडरे, शहराध्यक्ष ( एनसीपी शरद पवार गट ) विलास कुऱ्हाडे, नवनाथ वहिले, गणेश नेटके, तुषार तापकीर, मनोज पवार, श्रीपाद सुर्वे, निखिल तापकीर, विश्वनाथ नेटके, श्रींचे पुजारी प्रफुल्ल प्रसादे आदी उपस्थित होते.

आळंदीत गरजू पथारी विक्रेते यांना छत्री वाटप

आळंदीतील महाद्वार , मंदिर परिसरासह प्रदक्षिणा मार्गावर बसलेल्या पथारी व्यावसायिक गरजू विक्रेते यांना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अशोक खांडेभराड, सेनेचे तालुका समन्वयक अमोल पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ मुंगसे, सेनेचे खेड तालुका नेते उत्तम गोगावले, आशिष गोगावले, माजी नगरसेवक रमेश गोगावले, माजी शहर प्रमुख विश्वनाथ नेटके, शिरूर लोकसभा संघटक अनिता झुजम, राजेश नागरे, गोविंद ठाकूर, तुकाराम ताजने, परिसरातील नागरिक,भाविक, विक्रेते आदींचे उपस्थितीत छत्री वाटप करण्यात आले. (ALANDI)

शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व माजी उपसभापती व खेळ आळंदी विधानसभा निवडणूक समन्वयक अमोल दादा पवार यांच्यावतीने राजगुरुनगर चाकण व स्त्री क्षेत्र आळंदी या तीनही शहरांमध्ये व रस्त्याच्या कडेला भाजीपाला फळ विक्रेते व इतर व्यावसायिकांना निवारा म्हणून मोठ्या छत्र्या वाटप करण्यात आल्या. (ALANDI)

त्याप्रसंगी अमोल दादा पवार, जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव वर्पे, तालुकाप्रमुख रामदास आबा धनवटे, महिला आघाडीच्या नेत्या विजया शिंदे, ज्येष्ठ नेते सुरेश आण्णा चव्हाण तालुका महिला संघटिका उर्मिला सांडभोर, जिल्हा परिषद सदस्य तनुजा घनवट, उत्तमराव गोगावले, युवा नेते संजय घनवट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ मुंगसे, डॉक्टर शैलेश मोहिते, महिला आघाडीच्या जिल्हा उपसंघटिका अनिता झुजम, लक्ष्मण जाधव बाळा ताये, अशोक मुके, सुदाम कराळे, संतोष राक्षे, श्रीकांत सोनवणे, शहर प्रमुख दिलीपराव तापकीर, मनोज पवार, आशिष गोगावले, विश्वनाथ नेटके, सचिन राक्षे निलेश वाघमारे, चंद्रकांत भोर, मनोहर गोरगले, कविता गिलबिले, एल बी तनपुरे, अनिल मिसार असे बहुसंख्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक

१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का

Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा

कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी

गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर

दिग्दर्शक फराह खान यांच्या आई मेनका इराणी यांचे निधन

ब्रेकिंग : गौरी गणपती उत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’

संबंधित लेख

लोकप्रिय