पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : चिंचवड केशवनगर येथील शरीफ गैबी पीर दर्गामध्ये भाऊसाहेब भोईर यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी स्थानिक मुस्लिम समाज बांधवानी विशेष दुवा (प्रार्थना) मागण्यात आली. (PCMC)
या वेळी भाऊसाहेब भोईर यांच्यावर प्रेम करणारे आणि त्यांच्या विजयाची आशा ठेवणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये समीर शेख, यासिन शेख, तोसिफ पिंजारी, निसार शेख, अमजद शेख, असलम शेख, आवेश शेख, शरीफ खान, शफीक खान, यासिन बागवान, जकिर बागवान, अमजद खान, शफीक खान, आणि उबेज शेख आदी उपस्थित होते. (PCMC)
स्थानिक मुस्लिम समाजाने एकत्र येऊन भाऊसाहेब भोईर यांच्या राजकीय वाटचालीला यश मिळावे, आणि त्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करावे, या हेतूने प्रार्थना केली. दर्ग्यातील या धार्मिक विधीमध्ये अनेक समाजबांधव सहभागी झाले होते.
प्रार्थनेच्या माध्यमातून मुस्लिम बांधवानी भाऊसाहेब भोईर यांच्या विधानसभा निवडणुकीत यशस्वी विजयासाठी प्रार्थना केली आणि त्यांच्या नेतृत्वाखालील विकास कार्यांसाठी समर्थन व्यक्त केले.