Tuesday, October 8, 2024
Homeजिल्हाJalna: जालन्यात बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू, 14 जण...

Jalna: जालन्यात बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी

Jalna : जिल्ह्यातील बीड मार्गावर आज सकाळी एक भीषण अपघात घडला आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रक बसवर जाऊन धडकला. आणि हा मोठा अपघात झाला. या अपघातात 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 14 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,बस हि गेवराईकडून अंबड कडे जात होती, तर मोसंबी भरून येणारा आयशर ट्रक जालन्याहून येत होता. त्याचवेळी वडीगोद्री महामार्गावर मठ तांडा गावाजवळ बस आणि ट्रकची समोरा समोर धडक झाली. दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रक बसवर जाऊन आदळल्यानं भीषण अपघात झाला.या अपघातात दोन्ही वाहनांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.बस मध्ये 30 प्रवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.या अपघातात 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 14 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर तात्काळ स्थानिक नागरिकांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमींवर जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून, या घटनेने मठ तांडा गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.

Jalna

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश

SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?

आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास

Konkan Railway : कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती

School Job : त्रिमूर्ती हायस्कूल अंतर्गत भरती; पात्रता फक्त 12वी पास

संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग

धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

संबंधित लेख

लोकप्रिय