Friday, December 27, 2024
Homeजिल्हाPune : पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर

Pune : पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर

पुणे : प्रादेशिक हवामान केंद्राने ९ जुलै रोजी (Pune) जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्गमीत केलेल्या आदेशानुसार, अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, या सुट्टीच्या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. (Pune)

जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले असून, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाण्याचे टाळावे, आवश्यक असल्यासच बाहेर पडावे असे सूचित केले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

धक्कादायक : भटक्या कुत्र्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरुणाचा तिघांवर जीवघेणा हल्ला

Mumbai : मुंबईसह कोकणात पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरू

महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य; १५ व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर

दिवसा ढवळ्या बिबट्याचा वावर, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला

मेंदू खाणाऱ्या अमिबाने 14 वर्षांच्या मुलाचा घेतला जीव

रिलसाठी स्टंट करताना दुचाकीवरून तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

संबंधित लेख

लोकप्रिय