पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : भोसरीतील भाजपच्या नगरसेविका प्रियांका प्रविण बारसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते आज यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे त्यांनी पक्षात अधिकृत प्रवेश केला. (PCMC)
यावेळी खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, कार्याध्यक्ष सागर तापकीर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश घेण्यात आला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात बाजी मारली. या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दहा पैकी आठ खासदार निवडून आणत महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता शरदचंद्र पवार यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले आहे.
तसेच शिरूर लोकसभेत डॉ. अमोल कोल्हे यांना मिळालेल्या जनतेचा कौल लक्षात घेत पिंपरी चिंचवड शहरातील अनेक लोकप्रतिनिधी यांचा कल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या दिशेने जाण्याचे संकेत आता मिळू लागले आहे. pcmc
भोसरीतील शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उच्चशिक्षित भाजप नगरसेविका प्रियांका बारसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे पिंपरी चिंचवड शहरात तुतारी जोरात वाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावेळी बोलताना युवक अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले “आज मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि भाजपच्या भ्रष्टाचाराला कंटाळून भाजपच्या नगरसेविका प्रियांका बारसे यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला. pcmc news
शरद पवार यांच्या शिव फुले शाहू, आंबेडकर विचारधारेला प्रभावीत होऊन प्रियांका बारसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला असून लोकसभा निकालाच्या आधी पासून त्या जयंत पाटील यांच्या संपर्कात होत्या. असे इम्रान शेख यांनी सांगितले.
येत्या काही दिवसात इतर पक्षातील पाच नगरसेवक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना प्रियांका बारसे म्हणाल्या, भाजपच्या स्थानिक नेतृत्त्वाच्या हुकूमशाही कार्यपद्धतीला कंटाळून तसेच आदरणीय शरद पवार यांच्या विचाराला प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे.
भाजपमधील अजून सहकारी आमच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्यास तयार आहेत. येणाऱ्या काळात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवक अध्यक्ष इम्रान शेख आणि सहकारी यांच्या सोबतीने पिंपरी चिंचवड शहरात जोमाने काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. pcmc
यावेळी रजनीकांत गायकवाड, शाहिद शेख, अशरफ शेख, फहिम शेख, मेघराज लोखंडे, समाधान अचलखांब, प्रवीण बारसे तसेच सुहास देशमुख, प्रथमेश बारसे, कान्होपात्रा थोरात, वैशाली पडवळ आदी युवक आणि महिला पदाधिकारी उपस्थित होते.


हेही वाचा :
Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती
मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला
ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार
मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर
ब्रेकिंग : शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात
ब्रेकिंग : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन
ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती
मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ११ जून दरम्यान हाय अलर्ट
कंगना रणौतला थप्पड मारणाऱ्या महिलेला प्रसिद्ध गायकाकडून नोकरीची ऑफर
मोठी बातमी : शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा भुकंप होणार ? अनेक आमदार ठाकरेंच्या संपर्कात
ब्रेकिंग : नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी टाकला बाँम्ब
मोठी बातमी : कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, RBI ने घेतला मोठा निर्णय !