Wednesday, January 15, 2025
Homeराज्यकांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, दिवसेंदिवस भावात घसरण !

कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, दिवसेंदिवस भावात घसरण !

पुणे : पंधरा ते वीस दिवसांपासून कांद्याच्या दरात रोज घसरण होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, आर्थिक डोलारा कोसळल्याने डोळ्यात पाणी आल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

संतापजनक ! सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एकीकडे महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे कांद्याच्या दरात (Onion rate) घसरण होत आहे. कांद्याच्या दरात अशीच घसरण होत राहिली, तर कांद्याचा उत्पादन खर्च निघेल की नाही, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. विशेष म्हणजे महिन्यापूर्वी कांद्याला असलेले भाव व आत्ताचे भाव यात फार मोठी तफावत असल्याने त्यांचा आर्थिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. एकीकडे लासलगाव बाजार समितीत लाल व उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक होत असते त्या प्रमाणात मागणी कमी झाल्याने कांद्याच्या दरात घसरण चालू आहे. येणाऱ्या काळात उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्यास कांद्याचे दर कोसळण्याची भीती आहे. आजच्या भावामुळे उत्पादन खर्चही निघणार नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शुक्रवारी (ता. ८) लाल कांदा ४८० नग, सात हजार ५०० क्विंटल झाली असून, कमीत कमी भाव ४०० रुपये, जास्तीत जास्त भाव ९३१ रुपये, तर सरासरी भाव ७५१ रुपये होता. उन्हाळ कांद्याचे ३७० नग, पाच हजार ५०० क्विंटल कांद्याची आवक झाली असून, कमीत कमी भाव ६०० रुपये, जास्तीत जास्त भाव एक हजार २१५ रुपये, तर सरासरी भाव एक हजार ४० रुपये होता.

तर एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई अटळ

कांद्याच्या सततच्या होणाऱ्या भावाच्या घसरणीमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय