Saturday, May 4, 2024
Homeराष्ट्रीयखूशखबर : "या" तारखे पासून भारतात 5G इंटरनेट सेवा होणार सुरु

खूशखबर : “या” तारखे पासून भारतात 5G इंटरनेट सेवा होणार सुरु

मुंबई : देशातील नागरिकांसाठी मोठी खूशखबर आहे. भारतात 1 ऑक्टोबर 2022 पासून 5G इंटरनेट सेवा (5G Internet Services) सुरु होणार आहे. त्यामुळे आता इंटरनेटच्या स्पीडमुळे आपली अनेक कामे जलद होऊ शकणार आहे.

ऑगस्ट महिन्यात 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला होता. त्यावेळी केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरु होईल अशी माहिती दिली होती. त्यानुसार आता ऑक्टोबर महिन्यापासून भारतामध्ये 5G इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते याचे शुभारंभ करण्यात येणार आहे. सरकारच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने यासंदर्भात ट्विट करत महत्त्वाची माहिती दिली आहे.

गेल्या आठवड्यात केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अल्पावधीत देशात 5G इंटरनेट सेवांचे 80 टक्के कव्हरेज करण्याचं लक्ष्य ठेवल्याचं सांगितले होतं. यामुळे भारतीयांना मोठा फायदा होणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय