Sunday, May 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडरोटरी क्लब ऑफ निगडी आयोजित रनाथॉनमध्ये धावले ४ हजार स्पर्धक 

रोटरी क्लब ऑफ निगडी आयोजित रनाथॉनमध्ये धावले ४ हजार स्पर्धक 

मोरे, गोडबोले, भोयर, मुग, भंडारे, देसाई, कणभरकर, कांबळे, करकरे प्रथम 

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : रोटरी क्लब ऑफ़ निगडीच्या वतीने दिनांक ८ रोजी आयोजित केलेल्या “रनाथॉन ऑफ होप” या मॅरेथॉनमध्ये ४ हजार स्पर्धेक धावले. 

या स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी रोटरी क्लब ३१३१ च्या प्रांतपाल मंजू फडके,बॅंक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक राजेश कुमार, झोनल व्यवस्थापक राहुल वाघमारे, रोटरी क्लब निगडीचे अध्यक्ष हरबिंदरसिंग दुल्लत, सचिव शशांक फडके, रनथॉनचे संचालक विजय काळभोर आदी संचालक, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बॉइज ४ सिनेमाच्या कलाकारांनी स्पर्धेला हजेरी लावून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह सीटीवन कंक्ट्रक्शनचे संचालक संदीप आगरवाल,युनिक डेल्टाफोर्सचे चेअरमन प्रभाकर साळुंखे, बॉश कंपनीचे विपणन प्रमुख हेमंत जाधव, मनिपाल रुग्णालयाचे ललित सासणे,नेक्सझू सायकलचे व्यवसाय प्रमुख चिंतामणी सरदेसाई, अल्ट्राटेक सिमेंटचे विभागीय प्रमुख रवी सिंग, पीसीईटी इंफिनिटी रेडिओच्या माधुरी ढमाले, पोलिस वाहतूक शाखा यांचे विशेष सहकार्य लाभले.

या स्पर्धेत केनियातील ६ जण, पोलीस दलातील १५० पोलीस अधिकारी व कर्मचारी,एनडीआरएफ आणि सीआरपीएफचे जवानांनी विशेष सहभाग नोंदवला.

या स्पर्धेच्या माध्यमातून संकलित होणाऱ्या निधीतून रोटरी क्लब ऑफ़ निगडी तर्फे ग्रामीण भागात काही समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये आनंदी शाळा, आनंदी ग्राम, वैद्यकीय प्रकल्पाचा समावेश आहे. यासाठी हा निधी खर्च केला जाणार असल्याची माहिती रनाथॉनचे संचालक विजय काळभोर यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष हरबिंदर सिंग यांनी केले. सूत्रसंचालन रेडियो सीटीचे आरजे केदार जोशी यांनी केले तर आभार विजय काळभोर यांनी मानले. 

स्पर्धेचा निकाल अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पुढीलप्रमाणे :

२१ किमी – पुरूष गटात विवेक मोरे (वेळ १ तास, ६ मिनिटे, ४९ सेकंद), 

अक्षय कुमार (१:७:१), विवेक यादव (१:८:३८), 

महिला- प्राजक्ता गोडबोले (१:२५:९), प्रमिला पाटील (१:३६:८), शीतल भंडारी (१:३८:४१) केनियाच्या सुझान चेबेट यांना विशेष बक्षीस दिले.

१० किमी वय ४५ पेक्षा अधिक 

पुरुष – जयपाल भोयर (३१ मिनिटे ३९ सेकंद), गोवर्धन मीना (३५:५४), संतू वर्धे (३६:३७), 

महिला – पल्लवी मूग (४७:३९), प्रसन्नप्रिया रेड्डी (४७:५३), शृति भिडे (५७:१३) 

१० किमी वय ४५ पेक्षा कमी गटात 

पुरुष- शुभम भंडारे (३०:१८), आसिफ खान (३०:३९), मृणाल सरोदे (३०:५८) 

महिला 

सोनाली देसाई (३८:४६), शिवानी चौरसिया (४१:२०), ऐश्वर्या खळदकर (४३:३१), केनियाची लिलियन रुट्टो (३७:२२) विशेष बक्षीस

५ किमी ४५ पेक्षा अधिक वयोगटात पुरुष

रंजीत कणभरकर (२८:३४), समीर कोयला (२९:४३), मुकेश मिश्रा (३०:२३)

महिला

निशानी कांबळे (३४:१४), पूजा माहेश्वरी (३५:५२), सुरेखा गावडे (३७:३२) 

५ किमी ४५ वयातील पुरुष 

दिव्यांशू कुमार (२४:४२), अभिषेक देवकाते (२४:५४), यशराज चकुरे (२५:५५) 

महिला 

यामिनी ठाकरे (२८:१६), सृष्टी रेडेकर (२८:४७), मानसी यादव (३०:०३)

कॉर्पोरेट विभाग- ५ किमी (वैयक्तिक) 

अनुज करकरे (२२:२२), केशव गुजारे (२२:४८), मयूर काकडे (२३:०६) 

कॉर्पोरेट (सांघिक)

एंप्रो इंडस्ट्रीज प्रा लि, एमर्सन इंडस्ट्रीज, बॉश कंपनी 

यांना प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय