Friday, December 27, 2024
Homeग्रामीणजुन्नर : सेवास्फुर्तीची 33 वर्षे : तमाशा कलावंत ते मुख्याध्यापक असा संघर्षमय...

जुन्नर : सेवास्फुर्तीची 33 वर्षे : तमाशा कलावंत ते मुख्याध्यापक असा संघर्षमय प्रवास !


जुन्नर
 (पुणे) : जुन्नर तालुक्यातील दौंड्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या निमगिरी या गावात विठ्ठल निंबा रढे यांचा जन्म झाला. तो दिवस होता. १ जून १९६३ सालचा. अशा दुर्गम आदिवासी भागातील या माणसाने तमाशा कलावंत ते मुख्याध्यापक असा संघर्षमय प्रवास केला. आज (दि. ३१ मे) ते सेवानिवृत्त झाले 

आई सोमाबाई आणि वडिल निंबा आणि ३ भाऊ आणि २ बहिणी असा हा परिवार. विठ्ठल रढे लहानपणी खोडकर व चाणाक्ष, त्यांचे प्राथमिक शिक्षण निमगिरी येथे झाले. पुढच्या शिक्षणासाठी जुन्नर तालुक्याच्या ठिकाणी आले. तेल गिरणीत काम करुन दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती थोडी बेताची होती। त्यामुळे हॉटेल मध्ये काम करणे, मिल मध्ये काम करणे त्यांनी अंगीकारले. तसेच त्यांनी एक कलावंत म्हणून तमाशा फड गावात उभारला होता. 

आपले जोडीदार नोकरीला लागल्याचे पाहून आपण पण नोकरी करावी अशा हेतूने कोल्हापूर जिल्ह्यात अर्ज केला आणि दि.7 सप्टेंबर 1988 ला गोधनगरवाडा तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथे आपल्या नोकरीची सुरुवात केली. धनगर समाजाच्या पाड्यावर त्यांची नोकरीची सुरुवात झाली. मुलांमध्ये रमून जाऊन मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण केली. कोंड्या हा त्यांचा आवडता मित्र बनला. दिवसामागून दिवस जाऊ लागले। गुरुजी मुलांमध्ये रमू लागले नंतर गोधनगरवाडा येथून जि.प.शाळा कोविन्द्रे ता.चंदगड येथे बदली झाली. मुलांना हसतखेळत शिकविण्यात गुरुजींचा हातखंडा होता.

मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्यानंतर केंद्रशाळा हासुर दुमला ता.करवीर येथे 1997 ते 2005 या कालावधीत सेवा केली. केंद्रशाळा नागाव ता. हातकणंगले येथे 2013 पर्यंत आपल्या कामाचा ठसा उमटविला. विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्यात ते रमत असत. 2013 ते 2014 जि.प शाळा संभापुर या शाळेत सेवा केली नंतर 2014 ते 2019 इंदिरानगर येथे सेवा केली. नंतर 2019 ते 31 मे 2021 जि.प.शाळा कुमारइंगळी येथे नोकरीची सेवा समाप्ती 33 वर्षे पूर्ण करून गुरुजी सेवानिवृत्त झाले.

 

संबंधित लेख

लोकप्रिय