Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडश्रावण, निसर्ग कवितांनी २४ वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल उत्साहात संपन्न 

श्रावण, निसर्ग कवितांनी २४ वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल उत्साहात संपन्न 

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : नक्षञाचं देणं काव्यमंच, भोसरी वतीने दरवर्षी प्रमाणे सलग २४ व्या वर्षीही राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल व राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धा पारितोषिक वितरण आणि १७ व्या दिवाळी अंक स्पर्धे बक्षिस वितरण समारंभाचे आयोजन सायन्स पार्क, चिंचवड येथे आयोजन करण्यात आले होते. 24th State Level Shravani Poetry Conference held with enthusiasm

संपूर्ण महाराष्टातून या श्रावणी काव्यमैफलला कवी कवयिञी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सहभागींना सन्मानपञ व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या उदघाटीका सुप्रसिदध कविवर्या वृषाली टाकळे (रत्नागिरी), कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुप्रसिदध कवयिञी, समाजसेविका, शिक्षणतज्ञ डाॅ.अलका नाईक (मुंबई) उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व सुप्रसिदध उद्योजक  समाजसेवक डाॅ.शांताराम कारंडे(मुंबई), उद्योजक वसंत टाकळे (रत्नागिरी), रोटरी सुभाष वाल्हेकर, प्रदीप वाल्हेकर, सुधीर मरळ, रामेश्वर पवार, निलेश सोनवणे, गोविंद जगदाळे, जयसिंग वाळूंज, सायकलपट्टू दत्ता घुले, समाजसेवक अण्णा जोगदंड, महमंद मुलाणी, संगीता जोगदंड, धनंजय पाटील, डाॅ.लक्ष्मण हेबांडे, राजेश साबळे, भरत बारी, बबन चव्हाण, प्रा.दिलीप गोरे, अनंत देशपांडे, अनिल वडघुले इ.मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी उद्घाटक कविवर्या वृषाली टाकळे यांच्या शुभहस्ते पर्यावरण संदेश देत, वृक्षाला पाणी घालून आगळ्यावेगळ्या पध्दतीने उदघाटन झाले.

यावेळी वृषाली टाकळे म्हणाल्या, “नक्षञाचं देणं काव्यमंच हा कवींना आदर, सन्मान देणारे खरेखुरे व्यासपीठ आहे. गेली २४ वर्षे संस्थेने काव्यक्षेञात केलेली प्रगती कौतुकास पाञ आहे, भविष्यातील अनेक कवी या व्यासपीठावरुन घडत राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डाॅ.अलका नाईक म्हणाल्या,” कविता निर्मिती म्हणजे भावनांचा उद्रेक, संवेदनशील मनाचे चिंतनशील विचारांचे प्रगटीकरण आहे .समाजाचे आपण देणे लागतो. यासाठी नेञदान व अवयवदान ही चळवळ वाढण्यासाठी काव्यमंचवतीने प्रयत्न केला जात आहे.

कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे (कवी वादळकार)राष्टीय अध्यक्ष -नक्षञाचं देणं काव्यमंच यांनी दिली. श्रावणी राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धा घेण्यात आली. २६९ कवितांचा सहभाग यावेळी झाला, त्यात प्रथम क्रमांक-कविवर्य रामदास अवचर श्रावणसरी (अहमदनगर), व्दितीय क्रमांक-कविवर्य नवनाथ पोफळे-श्रावण(बीड), तृतीय क्रमांक-कविवर्या सुलभा चव्हाण-श्रावण बरसला(मुंबई) यांनी पटकावला. त्यांना स्मृतीचिन्ह, सन्मानपञ, गुलाबपुष्प मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. 

यावेळी १७ वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा घेण्यात आली. प्रथम क्रमांक-वारसा-अहमदनगर,  व्दितीय क्रमांक-कलासागर-पिंपरी, तृतीय क्रमांक -गंधाली-मुंबई यांनी पटकवला. यांना स्मृतीचिन्ह, सन्मानपञ, गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी केले. बहारदार सूञसंचालन सुरेश साळुंके, प्रीती सोनवणे यांनी केले. आभारप्रदर्शन सुनिल बिराजदार यांनी केले. सलग सहा तास हि काव्यमैफल रंगली. विश्वगीत पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमाच्या संयोजनात मोहन कुदळे, विनायक विधाटे, वसंत टाकळे, डाॅ.सपकाळ, रामदास हिॅगे, सुहास वाल्हेकर, दिव्या भोसले, अमोल देशपांडे, भाऊसाहेब आढाव, प्रशांत निकम, साईराजे सोनवणे, प्रकाश दळवी, संतोष देशमुख इ.सहभाग घेतला.

संबंधित लेख

लोकप्रिय