Saturday, May 11, 2024
Homeताज्या बातम्याबीड जिल्ह्यात २० कोरोना पॉझिटिव्ह; नागरिकांनो काळजी घ्या.

बीड जिल्ह्यात २० कोरोना पॉझिटिव्ह; नागरिकांनो काळजी घ्या.

बीड : बीड शुक्रवारी जिल्ह्यात २० जणांचे  अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. शुक्रवारी बीड जिल्ह्यातून २९३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २० पाॅझिटीव्ह तर २७३ निगेटिव्ह आले आहेत.

बाधितात बीड ८, गेवराई ६,परळी ४ तर आष्टी आणि धारुर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. आज पहाटे आलेल्या पॉझिटीव्ह अहवालात सर्वात जास्त रुग्णाची बीड शहरातील तर गेवराई मधील सहा व्यक्तींचा समावेश आहे. परळीत आज परत ४ अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे परळीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. धारुर शहरात परत १ सापडला आहे. दरम्यान आजच्या संख्येने बीड जिल्ह्याची आकडेवारी २०० पार झाली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय