Thursday, December 5, 2024
Homeराजकारणराज्यसभेच्या 19 जागांसाठी आज मतदान, तीन राज्यात अटीतटीचा सामना

राज्यसभेच्या 19 जागांसाठी आज मतदान, तीन राज्यात अटीतटीचा सामना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- आज 8 राज्यातील राज्यसभेच्या 19 जागांसाठी आज निवडणूक होणार आहे. मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये रंगतदार लढाई होणार आहे.

     यापूर्वी कोरोनाच्या महामारीमुळे 18 जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर कर्नाटकमधील 4 आणि मिझोरममधील व अरुणाचल प्रदेशच्या 1-1 जागेवर निवडणूक पार पडत आहे.

    राज्यसभेच्या 19 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये प्रत्येकी 4, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 3, झारखंडमध्ये 2 आणि मणीपूर, मिझोरम व मेघालय येथील प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होत आहे. सध्या मणिपूरमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण, सत्ताधआरी आघाडीतील 9 सदस्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे, तेथील एका जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीत रंगत आली आहे. येथून भाजपाने लीसेम्बा सानाजाओबा तर काँग्रेसने टी मंगी बाबू यांना उमेदवारी दिली आहे.

    कर्नाटकमधील 4 जागेवर माजी पंतप्रधान एचडी दैवेगौडा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, भाजपा उमेदवार इरन्ना काडादी आणि अशोक गस्ती हे यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले आहेत. तर, अरुणाचल प्रदेशमध्येही भाजपा उमेदवार नबाम रेबिया यांनी बनविरोध विजय मिळवत भाजपाची सीट काबिज केली आहे.

    आज सायंकाळीच या सर्व  19 जागांसाठी मतमोजणी होऊन विजयी व पराजीत जागांचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सोशल डिस्टन्सिंगचे पालन व प्रत्येक उमेदवार आणि मतदाराचे थर्मल स्क्रीनिंग करुनच मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने तशी खबरदारी घेतली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय