Sunday, May 12, 2024
Homeताज्या बातम्याJan Vishwas Rally:10 वर्षात निवडक उद्योगपतींचं तब्बल 16 लाख कोटी रुपयांचं...

Jan Vishwas Rally:10 वर्षात निवडक उद्योगपतींचं तब्बल 16 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं-राहुल गांधी

बिहार मध्ये इंडिया आघाडीच्या महासभेस 15 लाखांची गर्दी
पाटणा: दि.3-राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काढण्यात आलेल्या ‘जन विश्वास यात्रे’ची सांगता रविवारी पाटण्याच्या गांधी मैदानात झाली.सभेसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी राजा इत्यादी नेते उपस्थित होते.

या महारॅलीमध्ये लालू यादव यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करत त्यांच्यावर धर्मावरून जोरदार टीका केली. ‘हे मोदी म्हणजे काय? नरेंद्र मोदी अजिबात हिंदू नाहीत. आईचे निधन झालं तर मुलाने केस कापण्याची आपल्या देशात परंपरा आहे. मोदींनी सांगा ते केलं का?मोदी धर्माच्या नावावर द्वेष पसवरत  यावेळी केला आहे.

या सभेत राहुल गांधी यांनी मोदींच्या आर्थिक नितीवर टीका केली.
देशातील तरुण, शेतकरी आणि गरिबांवर अन्याय होत असून मोदी सरकार केवळ 10-12 उद्योगपतींसाठी काम करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केलाय. मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात देशातील काही निवडक उद्योगपतींचं तब्बल 16 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं आहे. मात्र, मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत नाही,भारतातील 50 टक्के लोकसंख्या ओबीसी आहे. दलित लोकसंख्येच्या 15 टक्के आणि आदिवासी 8 टक्के आहेत. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या हे प्रमाण 73 टक्के आहे, भारतातील मोठ्या कंपन्यांची यादी काढा, त्यात तुम्हाला एकही यातील व्यक्ती सापडणार नाही अशी थेट टीका त्यांनी पंतप्रधान मोदी यांचेवर केली आहे.

सभेला, कांग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सपा प्रमुख अखिलेश यादव, सीपीआई-एमचे सीताराम येचुरी सह बिहार मधील युवक, विद्यार्थी, शेतकरी, महिला संघटना यांची उपस्थित मोठी होती.
लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने रविवारी बिहारमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय