मुंबई : मुंबईत कालपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे चेंबूर येथे ५ घरांवर भिंत कोसळून त्यात ११ जणांचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
वाशीनाका येथील न्यू भारतनगर येथे डोंगराच्या कडेला ही वस्ती आहे. या डोंगराच्या बाजूला संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. काल पासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास ५ घरांवर ही भिंत कोसळून त्यात ११ जणांचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आतापर्यंत ढिगार्याखालून १६ जणांना बाहेर काढले आहे.
Maharashtra | 11 people killed after a wall collapse on some shanties in Chembur’s Bharat Nagar area due to a landslide, says National Disaster Response Force (NDRF)
Rescue operation is underway. pic.twitter.com/W24NJFWThU
— ANI (@ANI) July 18, 2021
त्यात या घरांमधील २० जण ढिगार्याखाली अडकले. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल, एनडीआरएफचे (NDRF) पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी बचाव कार्य सुरु केले आहे. जखमींना राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.