Friday, November 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवड5 फूट उंचीच्या 100 बुद्धमूर्ती, 100 रथात मिरवणूक, 100 गावांना बुद्ध मूर्तीदान

5 फूट उंचीच्या 100 बुद्धमूर्ती, 100 रथात मिरवणूक, 100 गावांना बुद्ध मूर्तीदान

वैशाख पोर्णिमा म्हणजेच बुद्ध पोर्णिमेला तथागत गौतम बुद्ध यांची जयंती जगभरात आनंद आणि उत्साहात साजरी केली जात असते. नाशिक महानगरीत यंदा आणखीनच उत्साहाला उधाण आले होते. नाशिक शहरातून हजारो नागरिकांनी बुद्ध मूर्तींची मिरवणूक काढली. यावेळी जिल्हाच्या विविध तालुक्यातील शंभर गावातील 500 श्रामणेर आणि हजारो बौद्ध बांधवांसह नागरिक सहभागी झाले होते. सम्राट अशोक जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि बुद्ध पोर्णिमेनिमित्त 23 एप्रिल ते 2 मे दरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये श्रामणेर शिबिर घेण्यात आले. या शिबिरात शंभर गावातील प्रत्येक पाच उपासकांना श्रामणेर शिबिरात दीक्षा देण्यात आली.

नाशिक शंभर जिल्हयांना शंभर गौतम बुद्धांच्या पाच फूटांच्या मूर्तींचे अनोखे दान करण्यासाठी शंभर रथांमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मूर्ती फायबरपासून एकाच साच्यात तयार करण्यात आल्या होत्या. फुलांची आरास आणि निळे झेंडे लावून शंभर रथातून निघालेली ही मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. तसेच अनेक किलोमीटर ही मिरवणूक चालली. शहरातील जुना आडगाव नाका, द्वारका, मुंबई नाका, गडकरी चौक, त्र्यंबक नाका, सीबीएस मार्गे गोल क्लब येथे शोभायात्रा निघाली. यानंतर महाबौद्ध धम्म परिषदेत भदन्त ज्ञानज्योती महाथेरो, भदन्त बोधीपाल, भदन्त धम्मरत्न, भदन्त सुगत, भदन्त आर्यनाग यांनी मार्गदर्शन केले. या सोहळ्यात सीमा पाटील आणि जॉली मोरे यांच्या बौद्ध भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.

संबंधित लेख

लोकप्रिय